22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeराष्ट्रीयराष्ट्रीय शौर्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना मिळणार दिल्ली सरकारकडून आर्थिक मदत

राष्ट्रीय शौर्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना मिळणार दिल्ली सरकारकडून आर्थिक मदत

नवी दिल्ली : दिल्ली सरकारकडून राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेला एमबीबीएसचा विद्यार्थी अक्षित शर्मा याला २५.५५ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. उच्च शिक्षणमंत्री आतिशी यांनी ही घोषणा दिली. उच्च शिक्षणमंत्री आतिशी यांनी राष्ट्रीय शौर्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थी अक्षित आणि अक्षिताचीही भेट घेतली. या दोघांना २०१७ मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला होता आणि गेल्या काही वर्षांतही दिल्ली सरकार आपल्या योजनेंतर्गत या दोन विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी अनुदान देत आहे.

यावेळी दिल्लीच्या उच्च शिक्षणमंत्री आतिशी म्हणाल्या की, देश आणि समाजासाठी शौर्य दाखवणा-या मुलांच्या पाठीशी केजरीवाल सरकार उभे असून, या मुलांचे शौर्य संपूर्ण देशासाठी उदाहरण आहे. या योजनेअंतर्गत दिल्ली सरकार शौर्य पुरस्कार प्राप्त करणा-या दिल्लीतील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यता प्रदान करते. देशातील कोणत्याही विद्यापीठात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाचे १०० टक्के शिक्षण शुल्क अनुदान म्हणून मिळते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR