23.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeराष्ट्रीयराहुल गांधी वायनाडसह रायबरेलीमधून विजयी आघाडी

राहुल गांधी वायनाडसह रायबरेलीमधून विजयी आघाडी

नवी दिल्ली :
लोकसभेच्या रिंगणात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी डबल धमाका केला आहे. राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळमधील वायनाडमधून विजयी आघाडी घेत विरोधकांना चारीमुंड्या चित केले आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून भाजपच्या दिनेश प्रताप सिंह यांना 3 लाखांहून अधिक मतांनी पिछाडीवर टाकत विजयी आघाडी घेतली आहे. तसेच करेळमधील वायनाडमधूनही राहुल गांधी यांनी 3 लाखांहून अधिक मतांची विजयी आघाडी घेतली आहे. जवळपास दोन्ही जागांवर राहुल गांधी यांचा विजय निश्चित असल्याचे मानले जात आहे.

रायबरेली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर, मागील 2019 च्या राष्ट्रीय निवडणुकीत रायबरेली ही काँग्रेसने उत्तर प्रदेशातून जिंकलेली एकमेव जागा होती. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चार निवडणुका आणि रायबरेलीमध्ये पोटनिवडणूक जिंकली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR