28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्ररिक्षाचालकाचे विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य

रिक्षाचालकाचे विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
तुला पैसे लागतात का, असे म्हणत एका विकृत रिक्षाचालकाने विद्यार्थिनीसमोर चालत्या रिक्षात अश्लील कृत्य केले. शुक्रवारी पंचवटी चौकात ही संतापजनक घटना घडली. वाळूजमधील १७ वर्षीय मुलगी शहरातील नामांकित पॉलिटेक्निक महाविद्यालयात तिस-या वर्षात शिकते. ती नियमित वाळूजवरून महावीर चौक व तेथून दुस-या रिक्षाने महाविद्यालयात ये-जा करते.

शुक्रवारी पेट्रोलपंपाजवळील महावीर चौकात उतरून रिक्षात बसली. तेव्हा रिक्षाचालकाने तिच्या कुटुंबाविषयी विचारणा सुरू केली. तुझा पाय दुखतो का, घरी पैशांची अडचण आहे का, मी तुला पैसे देतो, असे म्हणाला. तरुणीने त्याला रिक्षा थांबविण्यास सांगितले. मात्र, त्याने रिक्षा थांबवली नाही.

पंचवटी चौकातून जय टॉवरमार्गे रिक्षा रेल्वेस्थानकाच्या दिशेने जात असताना चालकाने अचानक अश्लील कृत्य केले. हे पाहून मुलगी घाबरून गेली. तिने आरडाओरड सुरू केली. चालकाने रिक्षा थांबवताच ती तात्काळ खाली उतरून रिक्षापासून दूर झाली. हे पाहून रिक्षाचालकाने वेगात पोबारा केला. त्यानंतर तिने कुटुंबीयांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. रिक्षाचा क्रमांक एमएच २०-५६६८ असा असल्याचा अंदाज मुलीने पोलिसांकडे व्यक्त केला. चालक २२ ते ३० वर्षे वयोगटातील हिंदी भाषिक असल्याचे तिने सांगितले. वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास सुरू केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR