19.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeरिफ्लेक्ट ऑर्बिटल देणार रात्रीही सूर्यप्रकाश!

रिफ्लेक्ट ऑर्बिटल देणार रात्रीही सूर्यप्रकाश!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
रात्रीसुद्धा सूर्य प्रकाश मिळाला तर? परंतु हा चमत्कार एका स्टार्टअपने केला आहे. यामुळे रात्री चंद्राऐवजी सूर्याची किरणांचा प्रकाश दिसू लागेल. कॅलिफोर्नियामधील स्टार्टअप कंपनी रिफ्लेक्ट ऑर्बिटल अंतराळात उपग्रह सोडून त्या माध्यमातून सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर आणण्याची योजना बनवली आहे. दिवसा हा उपग्रह सूर्यप्रकाश संग्रहीत करेल आणि रात्रीच्या वेळी तो पृथ्वीवर पाठवणार आहे.

रिफ्लेक्ट ऑर्बिटल कंपनीची योजना अंतराळात उपग्रह लॉन्च करण्याची आहे. त्या माध्यमातून सूर्य प्रकाश पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. रिफ्लेक्ट ऑर्बिटलचे सीईओ बेन नोव्हाक यांनी सांगितले की, सूर्य दिवसाच नाही तर रात्रीसुद्धा तुम्हाला प्रकाश देणार आहे. या योजनेला नाव ‘सनलाइट ऑन डिमांड’ असे आहे. यामुळे सूर्य प्रकाश दिवसा आणि रात्रीच्या बंधनातून मुक्त होणार आहे.

५७ लहान उपग्रह पाठवणार : लंडनमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना बेन नोवाक यांनी सांगितले की, आता उर्जेसाठी दिवस उजाडण्याची वाट पाहावी लागणार नाही. जेव्हा लागेल तेव्हा प्रकाश उपलब्ध होणार आहे. हा पर्याय अजेय शक्ती ठरणार आहे. मानवतेसाठी हा पर्याय मैलाचा दगड ठरणार आहे. त्यासाठी जवळपास ५७ लहान उपग्रह लॉन्च करण्याची तयारी केली जात आहे. हे उपग्रह ६०० किलोमीटर उंचीवर परिभ्रमण करणार आहेत.

स्टार्टअपमध्ये सात जणांची टीम या योजनेवर काम करत आहे. या स्टार्टअपने त्यासाठी लागणारी चाचणी पूर्ण केली आहे. आता २०२५ मध्ये उपग्रह अवकाशात पाठवण्याची योजना बनवली जात आहे. या कंपनीचे को-फाउंडर आणि सीईओ बेन नोव्हाक आहेत. दुसरे को-फाउंडर आणि सीटीओ त्रिस्टन सेमेलहॅक आहेत.

रिफ्लेक्ट ऑर्बिटलची ही कल्पना चमत्कारासारखी आहे. यापूर्वी रशियानेही हा प्रयोग केला आहे. १९९२ मध्ये रशियाने झानाम्या-२ मोहीम सुरू केली होती. त्यासाठी रशियाने अंतराळात एक आरसा बसवला होता. त्या माध्यमातून काही वेळ पृथ्वीच्या दिशेने सूर्यप्रकाश आला होता. तथापि, या यशाची पुनरावृत्ती करण्यात शास्त्रज्ञांना यश आले नाही. कारण त्या वेळी उपग्रह अवकाशात पाठवणे खूप महाग होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR