19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूररिलायन्स लातूर पॅटर्नची सीईटी परीक्षेत उत्तुंग भरारी

रिलायन्स लातूर पॅटर्नची सीईटी परीक्षेत उत्तुंग भरारी

लातूर : प्रतिनिधी
श्री संगमेश्वर चारीटेबल ट्रस्ट संचालित श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तथा रिलायन्स लातूर पॅटर्नच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे लातूर पॅटर्नमध्ये घवघवीत यश संपादन करून किर्तीमान यश स्थापित केले. दि. १६ रोजी  सायंकाळी मेडिकल व इंजिनीअंिरग महाराष्ट्र सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. या परिक्षेमध्ये मेडिकल सीईटीसाठी जवळपास ३.७९ लाख विद्यार्थी व इंजिनीअंिरग सीईटीसाठी जवळपास २.९५ लाख विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आहे.
श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय तथा रिलायन्स लातूर पॅटर्नमध्ये एकूण ४००  विद्यार्थ्यांनी एमएचटी-सीईटीची परिक्षा दिली. यामध्ये आतापर्यंत हाती लागलेल्या निकालानुसार  नागेश पांचाळ या विद्यार्थ्यांने ९९.६१६ परसेंटाइल घेऊन  प्रथम येण्याचा मान मिळविला तर सोहम वंजारी  ९९.६११, प्रथमेश कुडव ९९.१७ या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय येण्याचा मान मिळविला. 99 परसेंटाइल पेक्षा जास्त ६ विद्यार्थ्यांनी तर ९८ परसेंटाइलच्या पुढे १०, ९७ परसेंटाइलच्या पुढे १४, ९६ परसेंटाइलच्या पुढे २० विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. १२ वी बोर्ड परिक्षेप्रमाणे याही परिक्षेत त्रिपुरा तसेच रिलायन्सच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादित केले आहे.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. उमाकांत होनराव सर, संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम, कार्यकारी संचालक प्रा. ओंकार होनराव, उपप्राचार्य राजकुमार केदासे, प्रा. राकेश चौधरी, प्रा. रामशंकर यादव, प्रा. सतीश  पाटील, प्रा. प्रसाद कुलकर्णी, प्रा. मीरा मुंडे, प्रा. अश्विनी मोरे, प्रा. एम. आय. शेख, प्रा. तेलंग दीपमाला, प्रा. संगम खराबे, प्रा. प्रसाद फड, अधीक्षक प्रा. श्रीकृष्ण जाधव, प्रा. दीपक होनराव, प्रा. ज्ञानेश्वर पुरी, प्रा. श्रीराम कुलकर्णी व तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR