28.5 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeलातूर‘रीड लातूर’ उपक्रमाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील; नागरिकांनी केले कौतुक

‘रीड लातूर’ उपक्रमाचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील; नागरिकांनी केले कौतुक

लातूर : प्रतिनिधी
येथील डा.ॅ  बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांच्या सहकार्याने आयोजित मराठवाड्यातील पहिले शैक्षणिक महासंमेलनात ‘रीड लातूर’ उपक्रमाची माहीती देणारे एक दालन उभे केले होते. याचा शुभारंभ राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख, आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते  करण्यात आले.
 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी यासाठी ‘रीड लातूर’  करत असलेले कार्य समाजहिताचे असून यातून एक समृद्ध पिढी निर्माण होईल, असा विश्वास सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त करुन ‘रीड लातूर’  उपक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी ‘रीड लातूर’चे संस्थापक जिल्हा बँकेचे अध्यक्ष  धिरज विलासराव देशमुख यांनी  सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, खासदार डॉ. शिवाजी काळगे, आमदार विक्रम काळे यांना  उपक्रमाची सविस्तरपणे माहिती दिली. तीन दिवसीय शैक्षणिक महासंमेलनात  ‘रीड लातूर’ दालनास अनेकांनी सहपरिवार भेट देऊन उपक्रमाची माहीती घेऊन वाचन संस्कृती जोपासली जावी यासाठी करत असलेल्या कार्याचे कौतुक केले.
वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या जीवनात असून वाचनामुळे व्यक्तीमत्वाचा विकास होतो. ही बाब डोळ्यासमोर ठेवून जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख व सौ. दीपशिखाताई धिरज
देशमुख यांनी ‘रीड लातूर’  उपक्रमाची तीन वर्षांपूर्वी सुरुवात केली. समाज हिताच्या या उपक्रमाचे अनेकांनी मनापासून स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.  ग्रामीण भागातील जिल्हा परिषद  शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची पुस्तके मिळाल्याने विद्यार्थी खुप आवडीने नामांकित लेखकांची पुस्तके वाचत आहेत. मोबाईल व सोशल मिडीयाच्या काळात सर्वाना वाचनाचे महत्त्व जाणवत असून अनेकांनी आता पुस्तके वाचण्याकडे लक्ष केंद्रित केले असून वाचन संस्कृती जोपासण्यासाठी ‘रीड लातूर’ चांगले कार्य करत आहेत, अशा भावना ‘रीड लातूर’  दालनास भेट देवून अनेकांनी  व्यक्त केल्या आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR