22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूररुई, राळगा, वरवंटी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

रुई, राळगा, वरवंटी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

अहमदपूर : प्रतिनिधी
येथील तहसील कार्यालयात दि.२७ रोज सोमवारी सकाळी ११ वाजता रुई, राळगा व वरवटी या गावाचे सन २०२४- ते २०२५ नव्याने सरपंच पदाचे आरक्षण चिठ्ठी टाकून काढण्यात आले आहे. उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांचे आदेश व इतर प्रशासकीय आदेशानुसार उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नव्याने सरपंच पदाचे आरक्षण निश्चीत करण्यासाठी तहसीलदार शिवाजीराव पालेपाड यांची नेमणूक करण्यात आली आहे.
यावेळी नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर ,गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड या सर्वांच्या उपस्थितीत सरपंच पदाचे आरक्षण नव्याने जाहीर करण्यात आलेले आहे. शाहूराणी चव्हाण या नऊ वर्षाच्या मुलीच्या हाताने सरपंच पदासाठी चिट्ठी काढण्यात आली. यावेळी रुई-नामाप्र महिला यासाठी सरपंच पदाचे आरक्षण राखून ठेवण्यात आले  आहे. राळगा ग्रामपंचायतसाठी अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखून ठेवले आहे तर वरवंटी येथील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला यासाठी  राखून ठेवण्यात आलेले आहे. सन २०२४-२५ साठी अनुसूचित जातीसाठी सरपंच पदाचे नव्याने आरक्षण निश्चीत करण्यात आले  आहे.
दि.१ जानेवारी २०२४ ते दि.४ मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण नव्याने निश्चीत करणे बाबत दि.१४ मार्च २४ रोजी अधिसूचना निर्गमित करून रुई ,राळगा , वरवंटी या मुदत संपणा-या ग्रामपंचायतीसाठी आरक्षण निहाय सरपंच पदाचे वाटप केले आहे. त्यानुसार अहमदपूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीचे नव्याने सरपंच पदाचे आरक्षण दि.२७ मे रोज सोमवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय येथे काढण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार शिवाजीराव पालेपाड, नायब तहसीलदार महसूल चे मधुकर क्षीरसागर, गटविकास अधिकारी अमोलकुमार अंदेलवाड यांच्यासह वरील तिन्ही गावातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR