24.3 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeसोलापूर  रुग्णालयांमध्ये 'अँटी स्नेक वेनम'चा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध

  रुग्णालयांमध्ये ‘अँटी स्नेक वेनम’चा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध

सोलापूर: जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्ये ‘अँटी स्नेक वेनम’चा साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास यामध्ये आणखीन वाढ करण्यात येईल.असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी सांगीतले.

पावसाळा सुरू होताच सर्पदंशाच्या घटना वाढतात. दरवर्षी यात अनेकांचा बळीदेखील जातो. त्यामुळे सर्पदंशावर तत्काळ व योग्य उपचार आवश्यक ठरतो. याची दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांकडून जिल्ह्यातील हॉस्पिटलमध्ये ‘अँटी स्नेक वेनम’ हे इंजेक्शन उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे अनेकांचे जीव वाचत आहेत.

कमी झालेले जंगल, झुडुपे आणि त्यांच्या अन्नाच्या घटकांबाबत संकटांची व्याप्ती यामुळे सापांनी आपला मोर्चा लोकवस्तीच्या, त्याचप्रमाणे शेती, बागायतींच्या आसपास वळविलेला आहे. पावसाळ्यात साप बिळातून बाहेर पडतात आणि सुरक्षित जागा शोधू लागतात.

यादरम्यान त्यांची अनेकदा माणसाशी गाठ पडते. परिणामी सर्पदंशाचे प्रमाण वाढते. यापूर्वी अनेकांना सर्पदंश झाला आहे. यात मे आणि जून महिन्यातील सर्पदंशाची संख्या १०० वर आहे. पावसाळ्यात याची शक्यता जास्त असून पावसामुळे अनेक साप बाहेर पडतात. सर्पदंशावर ‘अँटी स्नेक वेनम’ हाच निश्चित उपचार आहे. सर्पदंशाचे फार कमी रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये जातात. त्यामुळे त्यांच्याकडे ‘अँटी स्नेक वेनम’ उपलब्ध असेलच असे नाही. अनेक रुग्णांना ते शासकीय रुग्णालयांकडे पाठवितात.

याची दखल घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत येणाऱ्या उपजिल्हारुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयात ईंजेक्शन उपलब्ध करुन दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आता वेळेत औषध मिळत असल्याने यातून अनेक लोकांचा जीव वाचत आहेत. याचा फायदा अनेक रुग्णांना होताना दिसून येत आहे.मागील दोन महिन्यांत सर्पदंशाचे प्रमाण वाढताच ‘अँटी स्नेक वेनम’चा वापरही वाढला आहे. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांकडे दोन हजार ३४० वायल उपलब्ध आहेत. याशिवाय उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय यांच्याकडे वायल उपलब्ध आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR