रेणापूर : प्रतिनिधी
बदलापूर ,चाकूर येथील येथील घटनेच्या निषेधार्थ व महिलांवर आणि मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या विरोधात शनिवारी (दि. २५) रेणापूर येथील महात्मा गांधी पुतळया परिसरात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करीत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला .
बदलापूर येथे एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या बालिकावर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी दि २५ ऑगस्ट रोजी ‘महाराष्ट्र बंद’ ची हाक दिली होती परंतु उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असून तो मागे घेण्यात यावा असे आदेश दिले होते. दि २५ रोजी बंद मागे घेण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काळे झेंडे आणि तोंडाला पट्टी बांधून निदर्शने करावे अशा सूचना दिल्या. त्यानुसार अखिल भारतीय कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यासह अन्य घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने दि २५ रोजी रेणापूर येथील महात्मा गांधी पुतळया परिसरात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तोंडाला काळी
पट्टी बांधून मूक आंदोलन करीत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.
या आंदोलनात कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष बालाजी कदम, उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका प्रमुख परमेश्वर सुर्यवंशी यांच्यासह महाविकास आघाडीचे मतीन अली सय्यद, मुसाभाई सय्यद, संजय इगे, पुजा इगे, उमाकांत खलंग्रे, शेषेराव हाके, निर्मला गायकवाड, रमेश सुर्यवंशी, प्रदिप राठोड, गोंिवंद पाटील ,उमेश सोमानी, पद्म पाटील, अशादुल्ला सय्यद, धनराज देशमुख, विश्वराव देशमुख, हनमंतराव पवार, रामंिलंग जोगदंड, भूषण पनुरे, पाशाभाई शेख, मनोहर व्यवहारे, दादाराव कांबळे, अजय चक्रे, प्रदिप काळे, विश्वनाथ कागले, सचिन इगे, रामहरी गोरे, रमेश बोने, रंगनाथ इरळे, रहीम पठाण, सतीश चव्हाण, अॅड प्रशांत आकनगिरे, बाळासाहेब करमुडे, अशोक फुंदे, शहाजी कुरे, गोंिवंद येलंगफळे, जगन्नाथ गाडे, संदिपान देशमुख, निखील कातळे, श्रीमंत काळे, बसीर शेख, कृष्णा चव्हाण, किशोर आळणकर , मेघराज चव्हाण, इलाही शेख, बाळासाहेब देशमुख, अनिल फुलारी, बालाजी कागले, शरद सोनवणे, दशरथ देशमुख, सुधाकर गरड, बाळासाहेब कातळे, राजू बचाटे, राजन हाके, भास्कर लहाने, ज्ञानेश्वर भुरे, मुन्ना शेख, मुन्ना आकनगिरे यांच्यासह महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.