23.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूररेणापूर तालुका प्रशासनातील विभागात शुकशुकाट

रेणापूर तालुका प्रशासनातील विभागात शुकशुकाट

रेणापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील महसुल विभाग,पंचायत समिती, आरोग्य विभाग, कृषी विभाग, शिक्षण विभाग विभागातील कर्मचारी जुनी पेन्शन लागु करावी म्हणून गुरुवारी दि.१४ डिसेंबरपासून काम बंद आंदोलनात सहभागी झाल्याने सर्वच कार्यलयात शुकशुकाट दिसून आला तर विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना या संपाचा परिणाम जाणवला. महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ रोजी व नंतर नियुक्त कर्मचा-याना परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना’ सुरू केली. मात्र मागील १८ वर्षातील या योजनेचे स्वरूप बघता ही योजना फसवी असून त्यातून सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना सामाजिक व आर्थिक स्थैर्य मिळत नाही.

त्यामुळे १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व कर्मचा-यांंना म.ना.से. अधि. १९८२ व १९८४ अंतर्गत जुनीच पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, अशी मागणी राज्यातील १८ लाख कर्मचा-यांच्या वतीने सातत्याने विविध आंदोलने, मोर्चे, उपोषणे, संप आदी माध्यमातून केली जात आहे. मागील वर्षी जुनी पेन्शन व नवीन पेन्शन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी शासनाकडून या त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती तिचा अहवाल प्राप्त होऊनही अद्याप जुनी पेंशन लागू करण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्यामुळे कर्मचा-यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. परिणामी गुरुवारी दि. १४ डिसेंबरपासून कर्मचा-यानी काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेताला आहे. या संपात पंचायत समिती, तहसील, तालुका कृषी कार्यालयसह अन्य विभागाचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. परिणामी सर्वसामन्य नागरिकांची कामे खोळंबली आहेत.

या संपात महसुलचे ६ अव्वल कारकून , ८ महसुल सहाय्यक मंडाळाधिकारी ५ , तलाठी २५ पैकी २३ संपात तर दोन रजेवर , १ वाहन चालक रजेवर , ३ शिपाई संपात सहभागी आहेत. पंचायत समिती अंतर्गत आरोग्य पर्यवेक्षक १, कृषी विस्तार अधिकारी २, कनिष्ट सहाय्यक लेखा १, पंचायत व्स्तििार अधिकारी २, ग्रामविकास अधिकारी ४, ग्रामसेवक ३३, विस्तार अधिकारी सांख्यिकी १ असे ४४ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत तालुका कृषी कार्यालयतील २९ कर्मचारी संपात सहभागी आहेत तसेच भूमि अभिलेख कार्यालयातील ९ कर्मचारी संपात सहभागी होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR