22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूररेणा मध्यम प्रकल्पात ३५ टक्के पाणीसाठा 

रेणा मध्यम प्रकल्पात ३५ टक्के पाणीसाठा 

रेणापूर : प्रतिनिधी
निम्या तालुक्याची तहान भागविण्या-या भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्याने या प्रकल्पात ३५ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मोठा  दिलासा मिळाला असून, प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.
रेणापूर तालुक्यातील रेणा मध्यम प्रकल्पाची एकूण क्षमता २१.८० दलघमी असून, सोमवारपर्यंत प्रकल्पामध्ये ३१.१५ टक्के जलसाठा झाला आहे. प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यास रेणापूर तालुक्यातील सिंचनासह पाणीपुरवठा योजनेला फायदा होणार आहे. मध्यम प्रकल्प हा तालुक्यातील निम्म्या  गावांसह बीड जिल्ह्यातील कांही गावांची  सिंंचनाची व पिण्याच्या पाण्याची तहान भागवतो. या प्रकल्पावर शेतकरी व नागरिक अवलंबून आहेत. रेणा मध्यम प्रकल्पात ७ जुनपर्यंत फक्त १.५ टक्का जलसाठा होता.
गतवर्षी तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस झाला. तसेच दरवर्षी परतीच्या पावसामध्ये मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरतो. याच काळात जास्त प्रमाणात जलसाठा झाल्यास पाण्याची क्षमता पाहून रेणा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येते मात्र गतवर्षी पावसाळा आणि परतीचा पाऊस न झाल्याने प्रकल्पातील साठा जेमतेम राहिला होता. परिणामी, जिल्हाधिका-यांनी पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित केला होता. त्याचबरोबर तालुका हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला होता.  उन्हाच्या तीव्रतेमुळे व पाणीपुरवठा योजनेसाठी उपसा केल्याने या मध्यम प्रकल्पात केवळ १.५ टक्के जलसाठा होता. तालुक्यात प्रामुख्याने प्रकल्प क्षेत्रात आठ जूनपासून सुरू झालेल्या पावसाने प्रकल्पात पाण्याची २१ टक्यांनी वाढला होता. त्यानंतर अधून-मधून पाऊस पडत गेल्याने जलसाठ्यातही वाढ होत गेली.
सद्यस्थिती ३५ टक्के साठा असून ९ ते १० महिने हा साठा पाणीपुरवठा योजनांसाठी चालू शकतो. मात्र, सिंंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याची आवश्कता असून, शेतक-यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. रेणा मध्यम प्रकल्पात १० जूनला २ टक्के वाढून पाण्याची टक्केवारी ३.४० टक्के, ११ जूनला १६ टक्के, १२ जून रोजी पाण्याची टक्केवारी २१ वर पोहचली होती. १० जुलैला २३.१५ व २१ जुलैला २४.४७ टक्के जलसाठा झाला होता. दोन-तीन दिवसांतील पावसामुळे प्रकल्पात पाण्याचा वेग वाढल्याने बुधवारी २४ जुलैपर्यंत ३५.१५ टक्के एकूण प्रकल्पात जलसाठा झाला आहे.  गेल्या आठवडाभरात प्रकल्प क्षेत्रामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने बुधवारपर्यंत ३१ टक्के साठा झाला असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR