28.1 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeलातूररेनकोट, छत्र्यांच्या किंमतीत यंदा ४० टक्क्यांची वाढ

रेनकोट, छत्र्यांच्या किंमतीत यंदा ४० टक्क्यांची वाढ

लातूर : सिध्देश्वर दाताळ
गेल्या चार पाच दिवसापासून जिल्ह्याभरात मानसून सुरु झाला आहे.  दोन दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस पडत असल्याने पाऊसाच्या पाण्यापासून बचाव कण्याकरिता लागणा-या साहित्यांचे स्टॉल शहरातील विविध भागात लागले आहेत. या स्टॉलवर रेनकोट, छत्री आणि पावसाळी टोपी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. बाजारपेठेत दाखल झालेले पावसाळी साहित्याचे दर गतवर्षाच्या तूलनेत यंदा काही दुप्पट झाले असून ३०० ते ४०० रुपयात मिळणा-या रेंकोटची किंमत तब्बल ५०० ते ७०० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर १०० रुपयांत मिळणारी छत्री १५० ते २०० रुपयांना विक्रीसाठी बाजारात उपलब्ध आहे.
 त्याच बरोबर पावसाळी टोप्या देखील ५० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. शाळकरी मुलांसह पालकांनी बाजारपेठेत गर्दी करत पावसाळी साहित्य खरेदी करण्यास सुरुवात केल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पावसाळा सुरु झालाकी बच्चे कंपनीपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच रेनकोट, छत्र्यांचे आकर्षण असते. आपली छत्री अथवा रेनकोट इतरांपेक्षा वेगळी  आणि आकर्षक कसे दिसेल. याकडे विशेष लक्ष देत नागरिक खरेदी करत असून त्­यांच्या पसंतीला पडणा-या विविध रंगी रेनकोट, छर्र्त्र्यांनी बाजार सजले आहेत.
विशेषकरुन गंजगोलाई, औसा रोड, पाच नंबर चौक, तसेच शहरातील मुख्य रसत्या लगत लावण्यात आलेल्या स्टॉलवर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. जून महिन्यात येणा-या पावसाची चाहूल लागताच अनेक नागरिक अडगळीच्या खोलीत ठेवलेल्या छत्र्या शोधण्याची घाई करतात. घरातील जुनी छत्री दुरुस्त करून घेतली जात आहे. तर बाजारपेठा पावसाळी वस्तूंनी सजत आहेत. या वर्षीही ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा वस्तू व्यावसायिकांनी बाजारात उपलब्ध केल्या आहेत.  शाळांना होणारी सुरुवात व पावसाचे आगमन यामुळे दरवर्षी हा हंगाम व्यावसायिकांना लाखो रुपयांचे उत्पन्न देऊन जातो. त्यामुळे व्यावसायिकांच्या नजरा आकाशाकडे लागलेल्या असतात. वरुणराजाच्या आगमनापूर्वी पंधरा दिवस आधीपासूनच  शहरातील विविध भागांत बाजारपेठेत पाऊसाचे साहित्य दाखल झाले आहे.
यात मोठी छत्री १५० ते २०० लहान छत्री १०० ते १२० रेनकोट साधा ४०० ते ४०० ट्रान्सपरंट रेनकोट ५०० ते ७०० चेन रेनकोट ५०० ते ७५० लाँग रेनकोट ६०० ते ८०० पुरुषांच्या रेनकोटमध्ये पॅट-शर्ट, पॅराशूट नायलॉन, ट्रान्सपरंट रेनकोट बाजारात दाखल झाले आहेत. मॉडर्न छत्र्या सगळीकडे उपलब्ध आहेत. युवक-युवतींसाठी कमी लांबीच्या विविध डिझाइन्सच्या छत्र्या बाजारपेठेत उपलब्ध असल्याचे किरकोळ व्यापा-यांनी सागीतले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR