24.4 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeमहाराष्ट्ररोबोटने शोधले जलवाहिनीतील दगड, झाडांच्या मुळांचे अडथळे

रोबोटने शोधले जलवाहिनीतील दगड, झाडांच्या मुळांचे अडथळे

संभाजीनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगरातील अनेक वसाहतींमध्ये दूषित पाणीपुरवठा होणे, शेवटच्या घटकापर्यंतच्या घरांना पाणीच न येणे अशा अनेक तक्रारी मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडे येतात. तक्रारींचे निरसन करण्यासाठी आतापर्यंत जलवाहिनीच खोदून काढावी लागत होती. आता रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे जलवाहिनीत कुठे अडथळा निर्माण होतो, कुठे गळती आहे, दूषित पाणी कोठून येत आहे, याचा शोध घेण्यासाठी केवळ काही मिनिटांचा अवधी लागतो. आतापर्यंत ५२ ठिकाणी रोबोटने यशस्वीपणे शोध घेतला. जलवाहिन्यांमध्ये दगड, झाडांची मुळे सापडली.

४८ लाख रुपये खर्च करून महापालिकेने दोन रोबोट खरेदी केलेत. चेन्नई येथील सॉलीनॉस रोबोटिक कंपनीचे कर्मचारी रोबोटद्वारे अडथळे शोधून काढतात. महिना १ लाख ४ हजार रुपये मानधन मनपा त्यांना देते. या तंत्रज्ञानाद्वारे जलवाहिनीवर अनधिकृत नळ कनेक्शन सुद्धा शोधले जात आहेत. संबंधिताला जागेवरच ५ हजार रुपये दंड भरून कनेक्शन अधिकृत करून दिले जाते. मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी नवीन तंत्रज्ञानाचे सादरीकरण पत्रकार परिषदेत केले. भविष्यात हेच तंत्रज्ञान ड्रेनेजलाईनसाठीही वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR