25.7 C
Latur
Sunday, January 5, 2025
Homeअंतरराष्ट्रीयलद्दाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

लद्दाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
लडाखमध्ये १४,३०० फूट उंचीवर पेंगाँग सरोवराच्या किनारी भारतीय लष्कराने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण गुरुवारी करण्यात आले. चीनलगत असलेल्या सीमेवर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ हा पुतळा उभारण्यात आला आहे.

लेहमधील अत्यंत धाडसी म्हणून ओळख असलेल्या लष्कराच्या १४ व्या तुकडीने म्हटले आहे की, या महान राजाबद्दलचा आदर आणि त्यांनी दिलेला वारसा कायम प्रेरणेचा स्रोत असल्याने हा पुतळा उभारण्यात आला आहे. लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले.

भारत-चीन सीमेवर ज्या दोन शेवटच्या टोकांवर वाद झाले त्या डेमचोक व देपसांग भागांतून लष्कर मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही आठवड्यांनी हे अनावरण करण्यात आले आहे. या भागातून सैन्य मागे घेण्यावर पेंगाँग सरोवराच्या भागात हिंसक चकमकीनंतर ५ मे २०२० रोजी पूर्व लडाख सीमेवर दोन्ही देशांत वाद निर्माण झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR