21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्र‘लाडकी बहीण’ ठरवणार ३८ आमदार

‘लाडकी बहीण’ ठरवणार ३८ आमदार

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना गेमचेंजर ठरेल, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून केला जात आहे. महाविकास आघाडीकडूनही आता योजनेची रक्कम वाढवण्याचे आश्वासन दिले जात आहे. प्रत्यक्ष या योजनेचा मतदानावर किती परिणाम होईल, हे निकालातून दिसेलच. पण राज्यातील ३८ मतदारसंघांतील आमदार निवडीत या लाडकी बहिणींचाच वरचष्मा राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयोगाकडून राज्यातील मतदारांची ३० ऑक्टोबरपर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार राज्यात ५ कोटी २२ हजार ७३९ पुरुष आणि ४ कोटी ६९ लाख ९६ हजार २७९ महिला मतदार आहेत. तर तृतीयपंथी मतदारांची संख्या ६ हजार १०१ एवढी आहे. एकूण ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार आपला हक्क बजावणार आहेत.

राज्यात विधानसभेचे २८८ मतदारसंघ असून त्यापैकी ३८ मतदारसंघांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. तर अनेक असे मतदारसंघ आहेत जिथे महिला व पुरुष मतदारांच्या संख्येत फारसे अंतर नाही. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीत महिलांचा कल महत्त्वाचा मानला जात आहे.
जिल्ह्यांचा विचार केला तर नंदुरबार, भंडारा, गोंदिया आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांत महिला मतदार अधिक आहेत. मात्र, मतदारसंघनिहाय आकडेवारी पाहिल्यास कोकणापासून विदर्भापर्यंत महिलांची संख्या अधिक असलेले मतदारसंघ आहेत.

कोणते आहेत मतदारसंघ?
शहादा, नंदुरबार, अकोला पश्चिम, नागपूर दक्षिण पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर मध्य, नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, तिरोडा, भंडारा, गोंदिया, साकोली, आमगाव, अर्जुनी मोरगाव, अरमोडी, डहाणू, ब्रह्मपुरी, पालघर, माहिम, कर्जत, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, कसबा पेठ, शिरोळ, कोल्हापूर उत्तर, कागल, चंदगड, सोलापूर शहर उत्तर, दापोली, रत्नागिरी, चिपळूण, सावंतवाडी, राजापूर, कणकवली, कुडाळ, मिरज आणि पलूस कडेगाव.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR