22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रलाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच

लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच

छ. संभाजीनगर: प्रतिनिधी
राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून गदारोळ सुरू आहे. योजनेवर विरोधकांनी टीका केली त्याचबरोबर अर्थखात्याने देखील यावर आक्षेप घेतला आहे. या योजनांबाबत बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून योजनांच्या घोषणा केल्या जात आहेत. परंतु राज्याच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे निवडणुकीपुरते एक-दोन हप्ते महिलांना दिले जातील. लाडकी बहीण योजना निवडणुकीपुरतीच असल्याचा दावा पवार यांनी केला आहे.

दरम्यान, राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून गदारोळ सुरू आहे. योजनेवर विरोधकांनी टीका केली त्याचबरोबर अर्थखात्याने देखील यावर आक्षेप घेतला आहे. या योजनांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. राज्याच्या तिजोरीमध्ये काही नाही.

प्रत्यक्ष निवडणुका जाहीर होण्याआधी या योजनेच्या माध्यमातून एखादा-दुसरा हफ्ता देऊन जनमाणूस आपल्या बाजूला करण्याचा प्रयत्न यातून दिसून येतो आहे. लोकांमध्ये अशीही चर्चा आहे की, या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. पूर्वी यांच्या हातात सत्ता असताना असे निर्णय का घेतले नाहीत अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. त्याचा काही ना काही परिणाम होईल असेही शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
सरकारच्या या योजना तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. एखाद-दुसरा हफ्ता देऊन लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही शरद पवार पुढे म्हणाले.

तर लोकसभेसारखेच निकाल
आजच्या राज्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे, असे मत जनतेचे झाले आहे. यामुळे लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला संधी आहे. लोकसभेसारखा निकाल येण्यासाठी महाविकास आघाडीत एकी हवी आहे. लोकांना आता पर्याय द्यावा, असे तिन्ही पक्षांत एकमत आहे.

डाव्या पक्षांनाही स्थान द्यावे
संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपावर चर्चा होणार आहे. त्यांच्या बैठकीची प्रक्रिया १२ तारखेनंतर सुरू होईल. काही झालं तरी जागेचा निर्णय घ्यावा, एकवाक्यता ठेवावी आणि लोकांना पर्याय द्यावा हे तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ठरवले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत डाव्या पक्षांनी मदत केली आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांना एकही जागा दिली नव्हती. आता त्यांच्यासाठी काही जागा सोडल्या पाहिजेत, असे शरद पवार यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाबरोबर लिंगायत, धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण द्यावे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आरक्षणाच्या योग्य रस्त्यावर जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. धनगर, लिंगायत, मुस्लिम हे त्या प्रक्रियेत आले, तर ती परिस्थिती बदलेल आणि कटुता राहणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR