22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्र‘लाडकी सून’ योजना सुरू करा

‘लाडकी सून’ योजना सुरू करा

पुणे : प्रतिनिधी
सरकारने ‘लाडकी सून’ योजना सुरू करावी, अशी मागणी मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी केली. ही योजना आली तर सुनांचे नशीब उजळेल, असे म्हणत या योजनेला राज्यातीलच नव्हे तर जगातील सगळ्याच महिलांची संमती राहील, असा विश्वास किरण वळसे पाटील यांनी व्यक्त केला आहे. पुण्यातील मंचरमध्ये सरकारने लागू केलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

दरम्यान,सरकारने ‘लाडकी बहीण’ योजना आणली, तशीच आता ‘लाडकी सून’ योजना आणावी. अशी योजना आली तर जगातील सर्वच महिला या योजनेचे स्वागत करतील. कारण प्रत्येक मुलगी ही कधी ना कधी सून होतेच अन् त्याच सुनेचं दु:ख कोणाला कळत नाही? अशी खंत व्यक्त करत ‘लाडकी सून’ योजना आली तर आपलं नशीब उजळेल, असेही किरण वळसेंनी आवर्जून नमूद केले.

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण पाटील यांनी थेट लाडकी सून योजना लागू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सरकार ही मागणी मान्य करते का? मंत्र्याच्या बायकोचे सरकार ऐकते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR