18 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeमहाराष्ट्रलाडक्या बहिणींमुळे वाचलो

लाडक्या बहिणींमुळे वाचलो

अजित पवारांनी गाजवली सभा महिलांना दिले महायुतीच्या विजयाचे श्रेय

बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच त्यांच्या भाषणाच्या खुमासदार शैलीने सभा गाजवत असतात. अशात आजही अजित पवार यांनी बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी वाचवले असे म्हटले आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यावेळी अजित पवार यांनी लोकसभा निवडणूक, विधानसभा, ईव्हीएमवरील आरोप या सर्व विषयांवर भाष्य करत विरोकांना प्रत्युत्तर दिले. तसेच, ईव्हीएम मशीन मध्ये घोळ असल्याचे सांगून विरोधक रडीचा डाव खेळत असल्याचेही अजित पवारांनी म्हटले.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत महायुतीतून अजित पवार यांच्या पक्षाला लढण्यासाठी अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. त्यातील एका जागेवर विजय मिळाला होता. तर विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाने ५१ जागा लढवत ४१ जागांवर विजय मिळवला. दरम्यान महायुतीच्या विधानसभा निवडणुकीतील विजयामागे लाडकी बहीण योजना असल्याचे सत्ताधारी पक्षांतील नेत्यांनी अनेकवेळा म्हटले आहे.

बारामतीतील कार्यक्रमात विविध विषयांवर बोलताना आपल्या भाषणाच्या शेवटी उपमुख्यमंत्री उपस्थितांचे आभार मानत होते. त्यावेळी कार्याक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांकडे पाहत अजित पवार म्हणाले, माझ्या लाडक्या बहिणींनी मला वाचवले यावेळेस. मी खोटे नाही बोलत, लोकसभेचा निकाल लागल्यानंतर विचार करत होतो की, आपले सरकार यायला पाहिजे. नाहीतर बरोबर आलेले ४०-५० आमदार म्हणतील हे घेऊन गेलं आणि आमचं वाटोळं केलं. आम्ही महिलांसाठी चांगल्या चांगल्या योजना आणण्याचा प्रयत्न केला. त्याचे बहिणींनी स्वागत केले. त्यामुळे आमच्या बहिणींनी मेहुण्यांचे पण ऐकले नाही. आत जाऊन जे बटन दाबायचे होते ते दाबले. आमच्या मेहुण्यांनी दुसरीकडेची बटनं दाबली, पण इकडून बटनं जोरात दाबल्यामुळे आम्ही चांगल्या मताधिक्याने निवडून आलो.

लाडकी बहीण योजनेचा महायुतीला लाभ
सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकत जोरदार कामगिरी केली होती. तर, सत्ताधारी महायुतीच्या वाट्याला १७ जागाच आल्या होत्या. त्यानंतर महायुती सरकारने राज्यात महिलांना अर्थिक सहाय्य करणारी लाडकी बहिण योजना सुरू केली होती. दरम्यान या योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठा लाभ झाल्याचे पहायला मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR