19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरलातुरात मोठे उद्योग व रोजगार निर्मितीसाठी सक्षम नेतृत्व अमित देशमुख यांना साथ द्या

लातुरात मोठे उद्योग व रोजगार निर्मितीसाठी सक्षम नेतृत्व अमित देशमुख यांना साथ द्या

लातूर : प्रतिनिधी
विकासरत्न विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख आणि माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी लातूरचा विकास केलाच आहे; परंतु, काळानुरुप बदलत चाललेल्या गरजांनुसार आवश्यक मोठे उद्योग आणि रोजगार निर्मितीसाठी सक्षम नेतृत्व अमित देशमुख यांना साथ द्यावी, असे आवाहन माजी खासदार सुधाकर शृंगारे यांनी केले.
लातूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमित देशमुख यांच्या प्रचारार्थ लातूर शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये आयोजित संवाद बैठकीत माजी खासदार सुधाकर शृंगारे बोलत होते. या वेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुनील बसपुरे, शेतकरी कामगार पक्षाचे नेते अ‍ॅड. उदय गवारे, भटक्या विमुक्तांचे नेते प्रा. सुधीर अनवले, कामगार नेते राजकुमार होळीकर, माजी नगरसेवक विजयकुमार साबदे, वर्षाताई मस्के, अ‍ॅड. अंगद गायकवाड, प्रा. प्रवीण कांबळे, रामराजे निंबाळकर, शिवाजी कांबळे, राहुल डुमणे, राजू गवळी, तनुजा कांबळे, अशोक सूर्यवंशी, काशिनाथ वाघमारे, आशुतोष मुळे, अमोल गायकवाड, विशाल सूर्यवंशी, नूतन हनुमंते तसेच प्रभाग क्र. ३ मधील आजी-माजी नगरसेवक, महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे पदाधिकारी, सदस्य, सर्व बुथप्रमुख, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR