लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील प्रभाग ८ मधील श्री औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळास भेट देत ‘श्री’चे मनोभावे दर्शन घेतले. या वेळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी श्री गणेशाची आरती करुन लातूरवासियांचे सर्व विघ्न दुर व्हावेत, अशी श्री चरणी प्रार्थना केली.
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, आज या ठिकाणी उपस्थित राहून श्रीची आरती करण्याचे भाग्य लाभले याबद्दल मनस्वी आनंद व्यक्त करतो. या मंडळाने लातूरचा मानाचा गणपती म्हणून आपली एक वेगळी ओळख समाज उपयोगी उपक्रम राबवून निर्माण केली आहे. येथील प्रसादाच्या रुपात मिळणारी वृक्ष भेट कौतुकास्पद आहे. या मंडळाकडून गेली पाच ते सहा दशके केलेले सामाजिक कार्य असेच पुढे अविरत सुरू राहावे आणि ते राहील अशी अपेक्षा व्यक्त करीत उपस्थित श्री औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळ पदाधिकारी, सदस्य आणि गणेश भक्ताचे लातूर वासीयांचे सर्व विघ्न दूर व्हावेत, अशी प्रार्थना गणराया चरणी करीत सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी स्वागताध्यक्ष डॉ. उमेश कानडे यांनी श्री आरतीसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करून मंडळाच्या माध्यमातून केले जाणारे समाज कार्य व गणेश मंडळाच्या वैशिष्ट्याची माहिती दिली.
या प्रसंगी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अॅड. किरण जाधव, विलास सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, ट्वेन्टी वन शुगर्सचे विजय देशमुख, डॉ. उमेश कानडे, दगडूअप्पा मिटकरी, अॅड. फारुख शेख, व्यंकटेश पुरी, चंद्रशेखर बसपुरे, भीमाशंकर सिद्धेश्वरे तसेच श्री औसा हनुमान गणेश सांस्कृतिक २०२४ कार्यकारणी अध्यक्ष प्रा. आशिष स्वामी, कार्याध्यक्ष विलास गोंदकर, मुख्य संयोजक डॉ. शिवानंद दडगे, उपाध्यक्ष नरेश पेद्दे, नागेश जाधव, सचिव ओमसाई येरटे, अक्षय गुजर, सहसचिव- धीरज जवळगेकर, धीरज चव्हाण, कोषाध्यक्ष शशिकांत कनडे, सह कोषाध्यक्ष अविनाश जवळे, सुरज दंडे, बालाजी झिपरे, अभिजित पतंगे, विलास आराध्ये, रेवण चिंचोटे, प्रवीण शिवनगीकर, अॅड. रोहित कनडे, चेतन कनडे, मयूर कोरे, सचिन हलकुडे, शैलजा वडजे, अश्विनी कनडे, रुपाली गोंदकर, प्रीती ब्याळे, शीतल स्वामी,दीपिका कनडे, प्रतिमा कनडे, रजनी बनभैरु, शांती येरटे, बाळासाहेब चाकूरकर, श्यामसेठ भराडीया, शिवा चवरे, डॉ. संजय वारद, नागेंद्र सिद्धेश्वरे, महेश कोळे, पवन तिवारी, आकाश खुब्बा, सुहास देशमुख, शुभम स्वामी, राहुल बाजपाई, कार्तिक कनडे, प्रमोद सोरटे, अनिकेत इंडे, गणेश कनडे, कपिल तांबोळकर, आनंद कोळे, प्रणव कोळे, संदीप हुमनाबादे, अझर तांबोळी, सुरज साखरे, सागर कुंचमवार, अभिजीत बाजपाई, संकेत इंडे, राजेश ढगे, अमित कनडे, राजाभाऊ गोंदकर, श्याम सुरवसे, संतोष टोंगळे, शिवानंद कोळे, अक्षय यशवंत, दत्ता स्वामी, प्रा. विश्वनाथ स्वामी, रुद्रमनी स्वामी, प्रसाद स्वामी, अलोक स्वामी, अॅड. देविदास बोरुळे पाटील, शेख कलीम, प्रा. एम. पी. देशमुख, करीम तांबोळी यांच्यासह श्री औसा हनुमान गणेश सांस्कृतिक मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, प्रभागातील नागरिक श्रीगणेश भक्त्त, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.