26.2 C
Latur
Tuesday, November 26, 2024
Homeलातूरलातूर ग्रामीण मतदारसंघ एक मॉडेल करू

लातूर ग्रामीण मतदारसंघ एक मॉडेल करू

लातूर :  प्रतिनिधी
येणारी विधानसभेची निवडणूक आपल्या प्रपंचाची असून मतदार संघांमध्ये शांतता राहिली पाहिजे. गुंडगिरी होता कामा नये ही सामान्यांची माफक अपेक्षा असते. काँग्रेसने नेहमी सामान्यांच्या विकासाचे राजकारण केले. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखाना पाहण्यासाठी जसे ब्राझील येथून माणसे आली, जिल्हा मध्यवर्ती बँक पाहण्यासाठी नाफेडची माणसे आली. येणा-या काळात  लातूर मतदार संघ पाहण्यासाठीही बाहेरून माणसे येतील, असा मॉडेल लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघ करु. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार धीरज देशमुख यांना आशीर्वाद द्यावा असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केले आहे.
लातूर येथे शेतकरी, पदाधिकारी, व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मंचावर लातूर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार धिरज देशमुख, माजी आमदार वैजनाथराव शिंदे, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक अँड श्रीपतराव काकडे जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवी काळे अशोकराव काळे, बळवंत काळे जनार्दन  वंगवाड बाळासाहेब कदम, अप्पासाहेब मुंडे,  राजकुमार पाटील, अनुप शेळके, पृथ्वीराज शिरसाठ, संभाजी सुळ, नरंिसग बुलबुले, सौ राजमाने सौ मोरे, चांदपाशा  इनामदार, कैलास पाटील, गोविंद बोराडे, दत्ता शिंंदे, रघुनाथ शिंंदे, अँड प्रवीण पाटील, हरिराम कुलकर्णी हे उपस्थित होते   माजी मंत्री देशमुख म्हणाले की, सत्तेवर आल्यावर शेतक-यांंचे उत्पन्न दुप्पट करू, दोन कोटी रोजगार देऊ. प्रत्येक व्यक्तीला पंधरा लाख रुपये देऊ अशी आश्वासने दिली. भारतीय जनता पार्टी सत्तेत असताना काम करू देत नाही सत्तेत आल्यावर काम करत नाही. चारशे रुपयांचा गॅस एक हजार रुपये गेला आहे.
निवडणूक म्हणजे शिमगा नसून ते एक लोकशिक्षण आहे. आम्ही कधी भेदभाव केला नाही विरोधकांनाही सढळ हाताने मदत केली आहे. आमची  भावना सामाजिक बांधिलकीची आहे, असे सांगून ते म्हणाले की, गुळ पावडर काढणांरे  साखर कारखान्यावर बोलतात. आमच्या बरोबर स्पर्धा जरूर करा ,ऊसालाही चांगला भाव द्या असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.  सरकारने ज्या घोषणा केल्या होत्या आश्वासन दिली होती ती कागदावरच आहेत याचाही समाचार यावेळी माजी मंत्री दिलीपराव
देशमुख यांनी घेतला. याप्रसंगी  कोंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, माजी सभापती अरुण कापरे माजी उपसभापती आप्पा मुंडे, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, आदीनी आपले मनोगत व्यक्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR