लातूर : प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा बँकात नावलौकिक असलेल्या जिल्ह्यांतील शेतक-यांची आर्थिक वाहिनी असलेली लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा आज दि. १२ सप्टेंबर रोजी गुरुवारी २ वाजता बँकेच्या मुख्यालयात जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासरावजी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून विशेष अतिथी म्हणून राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा आमदार अमित विलासरावजी देशमुख, लातूरचे खासदार डॉ शिवाजीराव काळगे यांची उपस्थिती राहणार आहे.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट इंडिया यांच्याकडून देशपातळीवर साखर उद्योग गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेल्या राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, विलास साखर कारखाना तोंडार यांना देशपातळीवरील बेस्ट शुगर फॅक्टरी अवॉर्ड मिळाल्याबद्दल विलास साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राज्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, जिल्हा बँकेकडून डिजिटल सेवा सुरू केल्याबद्दल लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार धीरज देशमुख यांचा व अन्य मान्यवरांचा यावेळी वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.
या वार्षिक सर्वसाधारण सभेला जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन सभासद सहकारी पतसंस्था सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार धीरज विलासरावजी देशमुख, व्हॉईस चेअरमन अॅड. प्रमोद जाधव कार्यकारी संचालक हणमंतराव जाधव सन्माननीय संचालक मंडळाने केले आहे.