लातूर : सिध्देश्वर दाताळ
लातूर तालूक्यात २३१ मिली मिटर पाऊस झाला आहे. या पावसाच्या जोरावर जमिनीतील ओल पाहून तालूक्यात रविवारपर्यंत ४८ हजार ४३३ हेक्टरवर (५९.५० टक्के क्षेत्रावर) शेतक-यांनी पेरण्या केल्या आहेत. गेल्या १५ दिवसांपासून पेरण्यांना पारंभ झाला आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी या पिकांना प्राधान्य दिले जात आहे. पेरणी केलेल्या पिकांना उभारी येण्यासाठी व नविन पेरणी करणा-या शेतक-यांसाठी सध्या दमदार पावसाची गरज आहे.
जिल्हाभरात गेल्या काही दिवासापासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामातील पेरणीला वेग आला आहे.लातूर तालूक्यात आजपर्यंत ४८ हजार ४३३ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरणी झाली आहे. जिल्हयात झालेल्या ३१०.६ मिलीमिटर पावसाच्या आधारे सरासरी ५९.५० टक्के क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या उरकल्या असून त्या आता अंतिम टप्यात आल्या आहेत.यात सर्वाधिक सोयाबनचा ६० हजार ४०४ हेक्टर क्षेत्रापैकी ४६ हजार ४३० हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. तालूक्यात खरीपाच्या पेरणीसाठी ८१ हजार ३९६.३० हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे. खरीप हंगामातील पेरण्या जुन महिण्याच्या दुस-या आठवडयापासून सुरू झाल्या आहेत. जिल्हयात गेल्या आठ-दहा दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे खरीपाच्या पेरणीला वेग आला.
लातूर तालूक्यात आजपर्यंत २३१ मि.मी मिटर पाऊस झाला असून जमिनीतील ओलाव्याच्या आधारावर शेतक-यांनी आतापर्यंत ४८ हजार ४३३ हेक्टरवर (५९.५० टक्के क्षेत्रावर) पेरण्या केल्या आहेत. यात सर्वाधिक ४६ हजार ४३० हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. तसेच तूरीचा १ हजार ३८३ हेक्टर, मूग ३०४ हेक्टर, उडीद १७८ हेक्टर, ९१ हेक्टरवर ज्वारी, बाजरी १२ हेक्टरवर पेरणी झाली आहे.