22.6 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeलातूरलातूर परिसरात पाऊस

लातूर परिसरात पाऊस

लातूर : लातूर परिसरात शनिवारी सायंकाळी साधारण आभाळ होते. परंतु रात्री उशिरा साडेदहानंतर आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळाने जोरदार पाऊस सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. मागच्या काही दिवसांत पावसाने उघडीप दिल्याने पेरण्यांना वेग आला होता. परंतु आता ब-याच भागातील पेरण्या आटोपल्या आहेत. त्यामुळे पेरणीनंतर पावसाची प्रतीक्षा करीत असलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला. कारण शनिवारी रात्री उशिरापर्यंत लातूर परिसरात पाऊस सुरू होता. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे.

यंदा लातूर जिल्ह्यात पाऊस लवकर झाला. वादळी वा-यासह सलग पाऊस झाल्याने शेतक-यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली. परंतु पावसाची उघडीप होत नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात पेरणी खोळंबली होती. मात्र, या आठवड्यात पाऊस गायब झाल्याने शेतक-यांनी लगबगीने पेरणी करून घेतली. अजूनही काही भागांत पेरण्या सुरू असतानाच शनिवारी रात्री अचानक लातूर परिसरात पावसाने हजेरी लावली. रात्री उशिरा आकाशात ढग दाटून आले आणि रात्री उशिरापर्यंत शांतपणे पाऊस बरसत होता. त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झाले होते. तसेच शेतशिवारात पाणी झाल्याने खरीप पिकांच्या वाढीला आता गती मिळणार आहे. यंदा लवकर पाऊस झाल्याने खरीप पिके बहरणार आहेत.

नांदेड जिल्ह्यातही पाऊस
नांदेड जिल्ह्यातही शनिवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात ब-याच भागात रात्री उशिरापर्यंत पाऊस झाला. हा पाऊस खरीप पिकांना पोषक असल्याने शेतक-यांना दिलासा मिळाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR