25.4 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमहाराष्ट्रलालपरी ‘हाऊसफुल्ल’

लालपरी ‘हाऊसफुल्ल’

छ. संभाजीनगर : तुळशी विवाह संपन्न होताच शुभविवाह सुरू झाले होते. सध्या तर लग्नसमारंभाचा सीजन जोरात सुरू असल्याने याचा एसटी महामंडळास मोठा लाभ होत आहे. व-हाडी मंडळींना लग्नाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यासाठी लालपरी हे भरवशाचे वाहन आहे.
सध्या अनेक जण खाजगी गाड्या यासाठी बुक करत असले लांब पल्ल्याच्या ठिकाणी जाण्यासाठी व-हाडींकडून एसटी महामंडळाच्या बस बुक करण्याकडे कल दिसत आहे. खासगी वाहनांच्या तुलनेत कमी दरांमध्ये आणि सुरक्षित प्रवासाची हमी असलेल्या एसटी बस विवाह सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात बुक करण्यात आल्या आहेत.

राज्य परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर आगारातून राज्य व राज्याबाहेरील ठिकाणी लग्नासाठी बसेस धावत आहे. कोतवालपुरा सिडको येथील बस आगारांमध्ये विवाह सोहळ्यासाठी बस बुकिंगची सोय करून देण्यात आली आहे. याशिवाय सर्व तालुक्यांच्या डेपोतूनही या गाड्या सुटत आहेत. जानेवारी महिन्यात १४ लग्नतिथी असून, गत दोन महिन्यात लग्नसराईने एसटी महामंडळावर कृपा केली आहे

बसेसची जास्तीत जास्त बुकींग करावी
२४ तासांसाठी एसटी महामंडळाची एक बस किमान १६५०० एवढे भाडे घेते. तर ३00 किमीपेक्षा अधिक अंतर पूर्ण केल्यास त्यापुढील भाडे हे ५५ रुपये प्रती किलोमीटर या दराने अधिकचे मोजावे लागते. परंतु बसने ३०० किमी पेक्षा कमी प्रवास केल्यास १६,५०० एवढे भाडे अदा करावेच लागते. त्याचबरोबर डिसेंबर महिन्यापासून सहलीसाठी देखील एसटी महामंडळाकडून बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

५० टक्के सवलत
शिक्षणाधिकारीचे ना हरकत प्रमाणपत्र सोबत जोडल्यास आणि विद्यार्थ्यांची पूर्ण यादी दिल्यास ५० टक्के सवलतीत शालेय विद्यार्थ्यांना सहलीसाठी बस उपलब्ध करून दिली जाते. शुभविवाहासाठी तसेच सहलीसाठी नागरिकांनी सुरक्षित प्रवासाला प्राधान्य देऊन एसटी महामंडळाच्या बसेसची जास्तीत जास्त बुकिंग करावी, असं आवाहन राज्य परिवहन महामंडळाच्या आगाराचे व्यवस्थापक सचिन क्षीरसागर यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR