26.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रलालपरी होणार हायटेक

लालपरी होणार हायटेक

एसटीमध्ये जीपीएस सिस्टीम बसविण्यात येणार

मुंबई : प्रतिनिधी
गाव-खेड्यात अन् ग्रामीण भागात एसटी अर्थात लालपरी ही लोकांची जीवनवाहिनी समजली जाते. गावातील लोकांना प्रवासासाठी एसटीचा मोठा आधार असतो. त्यामुळे प्रवासाचे मोठे साधन म्हणून लालपरी एसटीकडे पाहिले जाते.

दरम्यान, एसटी डेपोत, आगारात एसटीची वाट बघत प्रवाशांना तासन्तास थांबावे लागते. एसटी कधी येणार हे माहीत नसल्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. मात्र आता एसटी, लालपरी हळूहळू कात टाकत आहे. प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. एसटी महामंडळाकडून लवकरच अद्ययावत प्रणाली म्हणजे एसटीमध्ये जीपीएस सिस्टीम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना आता एसटीचे लाईव्ह लोकेशन समजणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून, प्रवासदेखील जलदगतीने आणि सुखकर होणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्य परिवहन महामंडळाने एसटीमध्ये अद्ययावत प्रणाली आणण्याचा निर्णय घेतला. एकीकडे दळणवळणाची साधने वाढली असताना दुसरीकडे काही राज्यातील अनेक जिल्ह्यांत लालपरीच्या फे-या मात्र मर्यादित आहेत. त्यामुळे प्रवाशांना एसटी कधी येणार? किती वाजता येणार? हे माहीत नसते. परिणामी ब-याचदा प्रवाशांना एसटीची वाट बघत तासन्तास ताटकळत राहावे लागते. मात्र आता राज्य परिवहन महामंडळातील एसटीच्या सर्वच गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसविले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना एसटीचे लाईव्ह लोकेशन समजणार असून, तुमची एसटी कुठपर्यंत पोहोचली? गाडीचा मार्ग, एसटीची वेळ, एसटी आगारातील थांब्याची वेळ, थांब्याचे ठिकाण, एसटी आगारात येण्याची अपेक्षित वेळ इत्यादी माहिती प्रवाशांच्या मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अगदी सोपा होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR