26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरलिंबवाडीत आली परिवहन महामंडळाची पहिली बस 

लिंबवाडीत आली परिवहन महामंडळाची पहिली बस 

चाकूर : प्रतिनिधी
तालूक्यातील ंिलबवाडी या छोट्याशा गावी महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाची बस पहिल्यांदाच गावात आली आणि गावातील आबाल, वृध्दासह, महिला, युवक यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि ग्रामस्थ आणि स्थानिक पुढारी यांनी बसचे जंगी स्वागत करून आनंदोत्सव साजरा केला.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना हे गाव दळवळणाच्या सुविधापासून वंचित होते. औसा डेपोची ही बस असून विभागंिनयत्रक अश्वजित जानराव, विभागीय वाहतूक अधिकारी संदीप पडवळ, डेपो मॅनेजर औसा-शंकर स्वामी, बसस्थानक प्रमुख हबीब शेख, पर्यवेक्षक किशोर माने यांचे आभार मानण्यांत आले. चालक पवार, वाहक महाजन यांनी या गावाला पहिली ट्रीप घेऊन आल्यानंतर सरपंच ंिहपळनेर अ‍ॅड.धंनजय कोरे, सेवानिवृत्त कर्मचारी आबासाहेब शिं्ाँदे, हनंमत जवळगाचे भानुदास राजूरे आणि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. औसा डेपोची ही बस दररोज दुपारी औसा येथुन दुपारी १.३० वाजता निघून लातूर -आष्टा-घरणी-वडवळ ना.,वाघोली–झरी-हानमंत जवळगा-ंिहपळनेर -ंिलंबवाडी -नागठाणा -परचंडा मार्गे -अहमदपूर सायंकाळी ४.३० वाजता पोहचेल नंतर परत अहमदपूरहून याच मार्गे लातूर मुक्कामी येईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR