हैबत : वृत्तसंस्था
लेबनॉनमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना मंगळवारी (१७ सप्टेंबर २०२४) समोर आली होती. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला, तर यामध्ये तब्बल २,८०० लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. हेझबोलाहच्या काही अधिका-यांकडील हजारो पेजर्सचे स्फोट झाले होते. यानंतर आता १८ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा स्फोट झाल्याची घटना समोर आली. दक्षिण लेबनॉन आणि उपनगरात हेझबोलाहने वापरलेल्या रेडिओचा आणि काही वॉकीटॉकीचा स्फोट झाला. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून ३०० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
पेजर बॉम्बस्फोटात नऊ लोकांचा मृत्यू झाला होता. तसेच तब्बल २८०० लोक गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा स्फोटाची घटना घडल्यामुळे लेबनॉन हादरले आहे. दरम्यान, आज झालेल्या स्फोटाच्या घटनेत जखमी झालेल्यांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती सांगितली जात आहे. ज्या ठिकाणी हेझबोलाहच्या पेजर स्फोटात मृत्यू झालेल्या लोकांचे अंतिम संस्कार केले जात होते, त्या ठिकाणीही स्फोट झाला. पेजर स्फोटांमुळे लेबनॉनमधील हजारो सदस्य जखमी झाले आहेत.