लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे हे बहुमताने विजयी झाल्याबद्दल बाभळगाव येथील विलासबाग येथील लोकनेते, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन डॉ काळगे आणि महाविकास आघाडीच्या पदाधिका-यांनी अभिवादन केले. यावेळी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख व विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते डॉ. शिवाजी काळगे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी दीपशिखा धिरज देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, अॅड. समद पटेल, अनुप शेळके, सुनील पडिले, अभय साळुंके, अजित माने, प्रवीण पाटील, राम स्वामी, इम्रान सय्यद, सुभाष घोडके, प्रमोद जाधव, विजय देशमुख, रविंद्र काळे, एकनाथ पाटील, संभाजी रेड्डी, मदन भिसे, डॉ अशोक पोतदार, डॉ. सतीश बिराजदार, अॅड. निखिल काळगे, गणेश ढगे, विपीन गवरे, विष्णूदास धायगुडे, अॅड. दीपक राठोड, ओमप्रकाश झुरुळे, सुपर्ण जगताप, संतोष देशमुख, गोविंद देशमुख, गणेश देशमुख, ईश्वरप्रसाद चांडक आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.