35.2 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeलातूरलोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा : माजी मंत्री आमदार अमित देशमुख

लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा : माजी मंत्री आमदार अमित देशमुख

लातूर : प्रतिनीधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेला आज बुधवार २० नोव्हेंबर रोजी सुरुवात होताच लातूर शहर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सौ. अदिती अमित देशमुख यांच्यासह बाभळगाव येथील बूथ क्रमांक ३७१ ग्राम सचिवालय बाभळगाव मतदान केंद्रात जाऊन बूथ मधील पहिले मतदान महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी केले.

लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावावा तसेच सशक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी घराबाहेर पडून जास्तीत जास्त मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेला बुधवार २० नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली आहे. लातूर शहर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सौ. अदिती अमित देशमुख यांच्यासह बाभळगाव येथे मतदान केले. यानंतर बुथ क्रमांक ३७३ व ३७४ ला भेट देऊन मतदान किती झाले याची माहिती घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR