27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभा निवडणुकीचे आज वाजणार बिगूल

लोकसभा निवडणुकीचे आज वाजणार बिगूल

निवडणूक आयोगाने आयोजित केली पत्रकार परिषद
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या (शनिवारी) वाजणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत २०२४ च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा उद्या होईल. त्यानंतर लगेचच देशभरात आचारसंहिता लागू होईल. याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

उद्या म्हणजेच शनिवार १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. अपवादानेच शनिवार-रविवारी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित करते. मात्र, यावेळी आधीच घोषणांना दिरंगाई झाल्यामुळे आयोगाने शनिवारचा दिवस निवडल्याचे दिसते. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

देशभरातील निवडणुका किती टप्प्यात पार पडणार, कुठल्या राज्यात कधी मतदान होणार, कुठल्या दिवशी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एनडीए आघाडी विरुद्ध इंडिया महाआघाडी अशी मुख्य लढत होणार आहे. या निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि त्यांच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने बहुमत मिळवले होते. त्यात भाजपने २९० जागा मिळविल्या होत्या तर एनडीएच्या एकूण ३३९ जागा निवडून आल्या होत्या. यामध्ये जेडीयू, शिवसेना यासारख्या पक्षांचा समावेश होता.

देशात ७ टप्प्यांत
होऊ शकते मतदान?
देशात ७ टप्प्यात लोकसभांचे मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोग यंदा मतदान आणि निवडणूक प्रक्रियेबाबत काही नाविन्यपूर्ण घोषणा करणार का, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR