28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलोकसभेला धक्का देणारा मराठवाडा भाजपला साथ देणार?

लोकसभेला धक्का देणारा मराठवाडा भाजपला साथ देणार?

 

लोकसभा निवडणुकीत महायुतीला मराठवाड्यात जरांगे आंदोलनाचा फटका बसला आणि एकूण ८ जागांपैकी संदिपान भुमरे यांच्या रुपाने केवळ छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचीच जागा जिंकता आली.

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणा-या जालन्यात रावसाहेब दानवे आणि बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. मात्र यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीने आखलेल्या काही योजना आणि मुद्दे महायुतीसाठी मास्टर स्ट्रोक सिद्ध होऊ शकतात.

येथील ८ लोकसभा जागांपैकी ३ जागा काँग्रेसला, ३ शिवसेनेला (ठाकरे गट), १ एनसीपीला (शरद पवार गट) आणि १ शिवसेना शिंदे गटाला मिळाली होती. विशेष म्हणजे, यात ८ पैकी ७ मराठा खासदार आहेत.

मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि हिंगोली या जिल्ह्यांतील विधानसभेच्या एकूण ४६ जागा आहेत. येथे २०१९ मध्ये युतीने एकूण २८ जागा जिंकल्या होत्या. यांपैकी भाजपला १६ तर शिवसेनेला (अखंड) १२ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला (अखंड) प्रत्येकी ८-८ जागा मिळाल्या होत्या. तर दोन जागा इतरांना मिळाल्या. मात्र, यावेळी जरांगे आंदोलनाचा किती आणि कसा परिणाम होतो, यावर बरंच काही ठरणार आहे.

मराठवाड्यात भाजप २० जागांवर निवडणूक लढत आहे, शिवसेना श्ािंदेगट १६ जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ९, तसेच रासपा १ जागांवर निवडणूक लढत आहे. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष अनुक्रमे १५-१६-१५ जागांवर निवडणूक लढवत आहेत. यामुळे एकूण ६ मोठे पक्ष निवडणूक रिंगणात आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR