16.5 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeउद्योगलोखंडाच्या कारखान्याची चिमणी कोसळली; ९ मृत, ३० अडकले

लोखंडाच्या कारखान्याची चिमणी कोसळली; ९ मृत, ३० अडकले

मुंगेली : वृत्तसंस्था
छत्तीसगडमधील मुंगेली जिल्ह्यात आज (दि.९) मोठी दुर्घटना घडली आहे. सायंकाळी सरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोखंड बनवणा-या कुसुम प्लांटमध्ये चिमणी कोसळली, ज्याखाली ३० जण अडकले. यातील ९ कामगारांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर तात्काळ अडकलेल्या लोकांना ढिगा-यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मुंगेली जिल्ह्यातील बिलासपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रामबोड गावात असलेल्या कुसुम प्लांटमध्ये हा अपघात झाला. प्लांटमधील एक चिमणी अचानक कोसळली, ज्यामुळे तिथे काम करणारे कर्मचारी त्याखाली अडकले. ढिगा-याखाली सूमारे ३० कामगार गाडले गेल्याचा अंदाज आहे. या घटनेनंतर प्लांटमध्ये आरडाओरडा सुरू झाला. अपघाताची माहिती तातडीने पोलिस व प्रशासनाला देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच सरगाव पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. घटनेचे गांभीर्य पाहून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि अग्निशमन दलाचे बचाव पथक ढिगा-याखालून लोकांना बाहेर काढत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR