16.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमुख्य बातम्यालोणावळा : रेल्वेच्या वॉटर फॉलमध्ये ५ जण वाहून गेले

लोणावळा : रेल्वेच्या वॉटर फॉलमध्ये ५ जण वाहून गेले

पुणे : वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरात पर्यटनासाठी आलेल्या अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्यातून हे अन्सारी कुटुंब वाहून गेले. ग्रामस्थ, वन्यजीव रक्षक, पोलीस यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू आहे. मात्र, त्याचा शोध लागला नाही.

भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील धबधब्याला रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखले जाते. अन्सारी कुटुंब रविवारी परिवारासोबत वर्षाविहारासाठी या परिसरात आले होते. पाण्याच्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी कुटुंब आलेले मात्र, पाण्याला वेग असल्याने वाहून गेले. एकमेकांना वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

धबधब्यातील पाण्याचा प्रवाह भुशी धरणात येतो, तिथं शोधकार्य सुरू आहे. आतापर्यंत दोन जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. वाहून गेलेल्यांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश आहे.

पर्यटकांची पंढरी समजल्या जाणा-या लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. लोणावळा परिसरात शुक्रवार, शनिवारी झालेल्या जोरदार पावसाच्या सरी आणि आज रविवारी सकाळपासून झालेला पाऊस यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR