मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून उमेदवार निवडीसाठी बैठकांवर बैठका घेतल्या जात असताना प्रकाश आंबडेकरांच्या वंचित बहुजन आघाडीने मात्र यात मोठी आघाडी घेतली. आघाडीने बुधवारी दहा उमेदवारांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार मुस्लिम समाजातील आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचितने आतापर्यंत कोणत्याही पक्षासोबत आघाडी केलेली नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबत जाण्याचे आंबेडकरांचे प्रयत्न सुरू होते. पण जागावाटपावरून चर्चा फिस्कटली. मुस्लिम, ओबीसी तसेच इतर समाजातील अधिकाधिक उमेदवार देण्याचा त्यांचा आग्रह होता.
आता विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी मुस्लिम समाजाला अधिक संधी देण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. बुधवारी जाहीर केलेल्या दहा उमेदवारांमध्ये सर्वजण मुस्लिम आहेत, हे या यादीचे वैशिष्ट्य म्हणावे लागले.
हे आहेत मतदारसंघ
वंचितच्या यादीमध्ये सांगली, पुण्यातील हडपसर, कल्याण पश्चिम, औरंगाबाद मध्य, परभणी या प्रमुख मतदारसंघांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे मलकापूर, बाळापूर, गंगापूर, माण आणि शिरोळ या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणाही करण्यात आली आहे.
सर्व १० उमेदवार मुस्लिम
१) मलकापूर – शहेजाद खान सलीम खान
२) बाळापूर – खतीब सैय्यद नातीकोद्दीन
३) परभणी – सय्यद समी सय्यद साहेबजान
४) औरंगाबाद – मो. जावेद मो. इसाक
५) गंगापूर – सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर
६) कल्याण पश्चिम – अयाज गुलजार मोलवी
७) हडपसर – ऍड. मोहम्मद अफरोज मुल्ला
८) माण विधानसभा – इम्तियाज जाफर नदाफ
९) शिरोळ – आरिफ मोहम्मद अली पटेल
१०) सांगली – अल्लाउद्दीन हयातचाँद काजी
दुस-या यादीतले १० आणि यापूर्वी जाहीर केलेल्या यादीतले ११ म्हणजेच आतापर्यंत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे २१ उमेदवार जाहीर झाले आहेत.