19.1 C
Latur
Thursday, November 7, 2024
Homeलातूरवलांडी आरोग्य केंद्रास गाजर गवत, झुडपांचा विळखा

वलांडी आरोग्य केंद्रास गाजर गवत, झुडपांचा विळखा

वलांडी : वार्ताहर
तालुक्यातील वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे गाजर गवत व काटेरी झुडुपांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. या विपरित परिणाम येथे येणारे रुग्ण व नागरिकांवर  पडत आहे.  तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले वलांडी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सिमाभागातील आळवाई, येलमवाडी, हरेवाडी, श्रीमाळी सह तालुक्यातील टाकळी, बोंबळी, कवठाळ, बालाजीवाडी, अचवला, दवणीहिप्परगा, बोळेगाव, अनंतवाडीसह खेड्यापाड्यातील ३० ते ३५ गावातील रुग्ण उपचारासाठी व बाळांतपाणासाठी व कूटूंब शस्त्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात तर वलांडी येथील आरोग्य केंद्रात दररोज १५० ते २०० ची रूग्ण (ओपीडी) उपचारासाठी येतात.  प्राथमिक आरोग्य केंद्राचा आलेला रूग्ण परीसरातील पसरलेल्या गाजर गवत व जागो जागी उकीरडे पाहून तो बरा होण्या ऐवजी आणखीन आजारी पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
जर एखाद्या महीलेची कूटूंब शस्त्रक्रिया झाली त्या महीलेस प्राथमिक आरोग्य केंद्रात किमान तीन दिवस तरी तेथे रहावे लागते. परीसरातील पसरलेले गाजर गवत व उकीरडे व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मूख्य गेट बाजूला येणा-या जाणा-या रूग्णांचे नातेवाईक व स्थाईक नागरीकांनी लघु शंका करून दूर्गंधी पसरवली आहे. आरोग्य केंद्रात राहणा-या रूग्णांना व उपचारासाठी येणा-या रूग्णांना मोठ्या प्रमाणात डासांचा सामना करावा लागत आहे. या डासांमुळे मलेरीया, डेंग्यू, टायफाईड आदी आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परीसरात वाढलेले गवत व काटेरी झाडे झूडपे या साप, विच्चू, यांना आश्रय मिळतो. व परीसरात पसरलेल्या घाणीमुळे येथील स्थाईक राहाणा-या  डॉक्टर व कर्मचारी यांच्या पण आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. यावर  आरोग्य प्रशासन लक्ष देण्याची गरज  आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे परीसर अवैध वाहतूक पार्कींगचा अड्डा झाला आहे. या अवैधरित्या पार्किंग होणा-या वाहनामुळे आरोग्य केंद्राच्या परीसरात मोठ्या प्रमाणात दूर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या अवैध पार्कींगकडे स्थानिक पोलीस प्रशासनाचे दूर्लक्ष होत आहे. यावर पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे व कारवाई करण्यात यावी असे आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांचे म्हणणे आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR