22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूरवसतिगृहातील मुलीचा मृत्यू; खून व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा 

वसतिगृहातील मुलीचा मृत्यू; खून व लैंगिक अत्याचाराचा गुन्हा 

लातूर : प्रतिनिधी
शहराच्या पूर्व भागातील एका मागासवर्गीय मुलीच्या वसतीगृहात निवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या मृत्युनंतर तिचे दुस-यांदा सोलापूर येेि शवविच्छेदन केल्यानंतर त्यात आलेल्या अहवालानूसार वसतीगृह संचालिका व तिच्या दोन मुलांच्या विरोधात पोलिसांत खुन व लैंगीक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहात अनेक मुली राहतात. एका मजुराच्या दोन मुली त्या वसतीगृहात राहात होत्या. २८ जुन रोजी सकाळी वसतीगृह संचालिकेचा संबंधीत मुलीच्या वडीलास फोन गेला. तुमची मुलगी दोरीमध्ये पाय अडकुन पडली आहे. ती दवाखान्यात आहे. तुम्ही तत्काळ या, असे सांगीतले. मुलीचे वडील तिथे गेले असता डॉक्टरांनी तुमची मुलगी मयत झाल्याचे सांगीतले. त्यानंतर त्या मुलीच्या वडीलांच्या मनात शंका निर्माण झाली.
काही दिवसांपुर्वीच त्या मयत मुलीने वडीलांकडे वसतीगृहात आमचा संचालिकेच्या नातेवाईकांकडून लैंगीक छळ होत असल्याचे तक्रारी नमुद केले होते. याबाबत संचालिकेकडे तक्रार केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान लातूर येथेच त्या अल्पवयीन मुलीचे शवविच्छेदन करण्यात आले व पोलिसांत आकस्मात मृत्यु म्हणुन नोंद करण्यात आली. पण, मुलीच्या नातेवाईकांमध्ये सदर मुलीच्या मृत्यूला कारण वेगळेच आहे, अशी शंका आली. त्यांनी त्या मुलीचे इतरत्र शवविच्छेदन करावे, तेही इन-कॅमेरा करावे, अशी मागणी केली होती.
त्या मयत मुलीचे शवविच्छेदन दुस-यांदा सोलापूर येथे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदन अहवालामध्ये सदर अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचा केला असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या प्रकरणी त्या मयत मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे आपली बाजू मांडल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी वसतीगृह संचाललिका व तिच्या दोन मुलांविरुद्ध खुन व लैंगीक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR