22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeमहाराष्ट्रवाघ नखे साता-यात!

वाघ नखे साता-यात!

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघ नखांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला होता ती वाघ नखे आज बुधवार १७ जुलै रोजी भारतात दाखल झाली आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथून ही वाख नखे मुंबई विमानतळावर आणण्यात आली आहेत. शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघ नख भारतात आणण्यासाठी गेल्या काही काळापासून राज्य सरकार प्रयत्न करत होते. अखेर ही वाख नखे भारतात आली आहेत.

कस्टम विभागाचे अधिकारी आणि सातारा पोलिसांच्या बंदोबस्तात लंडनहून आलेली वाख नखे साता-याकडे नेली जात आहेत. मुंबई विमानतळावर सकाळी १० वाजता ही वाख नखे दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाख नखे भारतात आणण्यासाठी गेल्या काही वर्षापासून राज्य सरकार प्रयत्न करत होते. लंडनहून कस्टमचे अधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या अधिका-यांनी ही वाख नखे मुंबईत आणली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात ही वाख नखे साता-यासाठी रवाना झाली आहेत.

लंडनहून आणण्यात आलेली वाख नखे शाहूनगरी सातारा येथे प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. या ऐतिहासिक घटनेसाठी सातारा जिल्ह्यात मोठी तयारी करण्यात आली आहे. यासाठी एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून तो दिमाखदार आणि राजेशाही थाटात केला जाणार आहे. वाखनख्यांच्या स्वागत सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. ही वाख नखे सात महिने शिवाजी महाराज संग्रहालयात असणार आहेत. जिल्ह्यातील दोन शाळेतील विद्यार्थ्यांना वाखनखे निशुल्क पाहता येतील. तर इतरांना १० रुपये तिकीट आकारले जाणार आहे. याची वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ५ अशी असणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR