18.6 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रवायकरांच्या खासदारकीचा निर्णय कोर्टाने ठेवला राखून

वायकरांच्या खासदारकीचा निर्णय कोर्टाने ठेवला राखून

सुनावणी पूर्ण, खासदारकी राहणार?
मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून रणकंदन सुरू असताना लोकसभा निवडणुकीत मुंबईतील मतदारसंघात केवळ ४८ मतांनी विजयी झालेल्या खासदार रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला शिवसेना ठाकरे गटाने थेट न्यायालयात आव्हान दिले होते. आता या प्रकरणी सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

६ महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची निवडणूक झाली होती. त्यामध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार रवींद्र वायकर यांनी शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला होता. त्यामुळे अमोल किर्तीकर यांनी मतमोजणीत घोळ असल्याचा आरोप करत रवींद्र वायकर यांना अपात्र करावे, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली असून, याचा निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीत निवडणुकीत रवींद्र वायकर यांना ४,५२,६४४ मते पडली तर अमोल कीर्तिकर यांना ४,५२,५९६ मते मिळाली होती. या प्रकरणाच्या सुनावणीचे प्रमुख असलेले न्यायमूर्ती संदीप मारने यांनी सुनावणीवेळी न्यायालयात याचिकेतील मुख्य मुद्दा हा निविदा मतांशी (टेंडर मतदान) संबंधित असून, किर्तीकर यांच्या म्हणण्यानुसार ३३३ निविदा मते होती. पण मतदाराला गेल्यावर आढळते की, त्याच्या नावावर आधीच कोणी तरी मतदान केले आहे, तेव्हा त्यास १७-बी फॉर्म दाखल करून मतदान करता येते. याला निविदा मते म्हणतात. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अमोल किर्तीकर यांचे वकील प्रदीप पाटील आणि अमित कारंडे यांनी असा युक्तीवाद केला की, मतमोजणी वेळी १२० निविदा मतांची मोजणीच झाली नाही. उपलब्ध माहितीनुसार ३३३ पैकी १२० मते मोजलीच नाहीत. त्यावेळी फेरमतमोजणीची विनंती करण्यात आली होती, पण निवडणूक अधिका-यांनी ती नाकारली. किर्तीकरांच्या वकिलांनी बरेच गंभीर आरोप केले.

 

 

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR