बीड : प्रतिनिधी
संगीतोन्मेष संस्था पुणे आणि माऊली महाराज संस्थान श्रीक्षेत्र चाकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाशिवरात्र महोत्सवानिमित्त दि. २५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान १७ वे अखिल भारतीय वारकरी संगीत संमेलन श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे आयोजित करण्यात आले आहे.
संमेलनाच्या अध्यक्षपदी वारकरी संगीत परंपरेचे अभ्यासक, प्रख्यात गायक आणि प्रतिभावंत संगीतकार पं. यादवराज फड यांची एकमताने निवड करण्यात आली, तसेच स्वागताध्यक्षपदी संस्थानाधिपती महादेव महाराज ऊर्फ तात्या यांची, तर कार्याध्यक्षपदी सुनील मिसाळ यांची निवड करण्यात आली आहे.
चाकरवाडी येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्याध्यक्ष सुनील मिसाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. पं. यादवराज फड हे बीड जिल्ह्याचे सुपुत्र असून त्यांच्या संगीत साधनेला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून यावर्षी हे विशेष संमेलन श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे आयोजित केले आहे त्यांची ‘सेऊ ब्रह्मरस आवडीने ’ वारकरी संगीत परंपरेतील ‘नऊ रत्न’ ही वारकरी संगीत परंपरेवर दोन पुस्तके प्रकाशित आहेत. त्याचप्रमाणे या संमेलनाच्या उपक्रमाद्वारे आतापर्यंत ५०० हून अधिक कलाकारांना संधी मिळवून दिली आहे.