बीड : प्रतिनिधी
बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणी रोज नवनवीन घडामोडी घडत आहेत. त्यातच आता खंडणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांच्या समर्थकांचे आंदोलन सुरू केले आहे. आज सकाळपासून वाल्मिक कराडची आई पारूबाई कराड यांनी परळी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे. या आंदोलनामुळे पारूबाई कराड यांची प्रकृती बिघडली आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणाची चौकशी सुरू आहे. यामुळे बीडमधील वातावरण तापले आहे. त्यातच आज सकाळपासून बीडच्या परळीत मोठ्या घडामोडी सुरू आहेत. एकीकडे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सातत्याने मोर्चा काढण्यात येत आहे. तर दुसरीकडे आता वाल्मिक कराडच्या समर्थकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज सकाळपासून वाल्मिक कराड यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. वाल्मिक कराडची आई पारूबाई कराड या परळी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले होते.
पारूबाई कराड या आज सकाळपासून परळी पोलिस स्थानकाच्या बाहेर बसून आंदोलन करत आहेत. त्यांच्यासोबत वाल्मिक कराड यांचे समर्थकही परळी पोलिस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलनासाठी बसले आहेत. तर दुसरीकडे काही समर्थकांनी परळीत रस्त्यावर जाऊन टायर जाळून आंदोलन केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.