21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमुख्य बातम्यावाल्मिक कराडकडून जप्त केलेलं सीम अमेरिकेत रजिस्टर?

वाल्मिक कराडकडून जप्त केलेलं सीम अमेरिकेत रजिस्टर?

बीड : प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराड याच्याकडून जप्त करण्यात आलेले सीम कार्ड हे अमेरिकेत रजिस्टर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराडच्या मोबाईल जप्तीनंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे निवडणूक काळात याच सीममधून अनेक फोन झाल्याचा एसआयटीला संशय आहे. दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया देताना म्हटले, आका जो आहे तो सोपा आका नाही. या आकाकडे १७ मोबाईल होते. तुम्ही आता नाविन्यपूर्ण योजना सांगितली की, तो अमेरिकेहून धमकी देत होता. तो अमेरिकेचे सीम वापरत असेल. तो ते वापरत असेल. आका काय-काय नाही करु शकत? आकाचा बाका ५०-५० लोकांना प्रत्येक महिन्याला काहीतरी ठराविक लोकांना रक्कम पाठवत होता, असा धक्कादायक दावा सुरेश धस यांनी केला.

दरम्यान, या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. हत्या आणि खंडणी हा एकच गुन्हा आहे, असं देखील अंजली दमानिया म्हणाल्या.

राजकीय वरदहस्त नसतं तर वाल्मिक कराड इतका मोठा कधी झालाच नसता. धनंजय मुंडेंनी कराडला पदोपदी वाचवलं नसतं तर तो इतका मोठा झालाच नसता. माझं सरळसरळ म्हणणं आहे की, ते दोन वेगळे नाहीत. एकच गुन्हा आहे. खंडणी पासून गुन्ह्याला सुरुवात झाली आणि याच गुन्ह्यातून संतोष देशमुख यांची हत्या झाली. त्यांनी विरोध केला नसता तर त्यांची हत्याच झाली नसती. कारण खंडणी मागणं आणि दहशत निर्माण करणं एकच होतं. त्यातूनच ही हत्या झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR