बीड : प्रतिनिधी
मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला त्याचवेळी वाल्मिक कराडला ३०२ का लावले नाही, असा सवाल करीत खंडणीचे आणि खुनाचे आरोप एकच आहेत. जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर राज्य एका खटक्यात बंद करेल, असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला.
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना उलटला आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी आंदोलन केले. यावेळी धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे वाल्मिक कराडवर मोक्का लावावा अशी मागणी केली जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शासन करा. ज्यावर खंडणीचा आरोप आहे त्यांच्यावर मोक्का लावा. फडणवीस तुमचे सरकार खंडणीखोर चालवत आहे का? खंडणीचे आणि खुनाचे आरोप एकच आहेत. जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली तर राज्य एका खटक्यात बंद करेल, असा इशारा मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.