19.3 C
Latur
Tuesday, January 14, 2025
Homeमहाराष्ट्रवाल्मिक कराडला अखेर मोक्का

वाल्मिक कराडला अखेर मोक्का

बीड : प्रतिनिधी
आताची मोठी बातमी समोर येत आहे. वाल्मिक कराड याच्यावर मोक्का लावण्यात आला आहे. त्याचा ताबा सीआयडीने मागितला आहे. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्याचा ताबा मिळवण्यासाठी सीआयडीने कोर्टासमोर अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आल्यानंतर आता सीआडीने कोर्टात अर्ज केला आहे. सीआयडीने खुनाच्या गुन्ह्यासाठी वाल्मिक कराडची चौकशी करायची आहे. त्यासाठी वाल्मिक कराडला ताब्यात द्या अशी विनंती सीआयडीने केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडला सीआयडीच्या ताब्यात देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सीआयडी लिंक तपासणार?
वाल्मिक कराड याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे कराडशी संबंधित आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा काही संबंध आहे का? याचा तपास सीआयडीला करायचा आहे. आरोपी आणि वाल्मिक कराड यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

हत्येचा कट रचल्याचा आरोप
वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा तपास करायचा आहे, असे एसआयटीने कोर्टात म्हटले आहे. त्यामुळे आता कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय म्हणाले अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे?
आज केवळ खंडणी प्रकरणात दोन्ही बाजूने युक्तिवाद करण्यात आला. कुठेही तपासात वाल्मिक कराड यांचा कुठलाही सहभाग नाही, असा युक्तिवाद कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी केला. त्यांच्यावर मोक्का लावण्याचा कोणताही युक्तिवाद झाला नसल्याची माहिती अ‍ॅड. ठोंबरे यांनी दिली.

‘परळी बंद’ची हाक

वाल्मिक कराड याला मोक्का लागल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. त्यांनी सकाळपासूनच तीव्र आंदोलन केले होते. समर्थक आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी ‘परळी बंद’ची हाक दिली आहे. आज वाल्मिक कराड यांच्या आईने सुद्धा पोलिस ठाण्याबाहेर त्यांना सोडावे यासाठी ठिय्या आंदोलन केले. शहरातील विविध दुकाने आणि आस्थापनं बंद करण्यात आली आहे. परळीचे सर्व व्यवहार हे ठप्प झाले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR