26.7 C
Latur
Friday, June 21, 2024
Homeलातूरविकसित तालुका म्हणून शिरूर अनंतपाळची ओळख निर्माण करु : खा. शिवाजी काळगे

विकसित तालुका म्हणून शिरूर अनंतपाळची ओळख निर्माण करु : खा. शिवाजी काळगे

शिरूर अनंतपाळ : प्रतिनिधी
आपण सर्वांनी दिलेल्या मतदानरूपी आशिर्वादामुळे मला संसदेत जाण्याची संधी मिळाली. मी आयुष्यभर आपल्या ऋणात राहून  सर्वांगिण विकासासाठी काम करीत राहीन. तसेच आपल्या तालुक्यातील विकासकामांना भरीव निधी देत शिरूर अनंतपाळ तालुक्याची ओळख विकसित तालुका म्हणून निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही लातूरचे नुतन खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी तालुकावासीयांना दिली.
    लातूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी खा. डॉ. शिवाजी काळगे यांचा आभार व जनसंपर्क दौरा निमित्त शिवनेरी महाविद्यालय सभागृहात उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. या आभार व जनसंपर्क दौरा कार्यकृमाच्या अध्यक्षस्थानी अशोकराव पाटील निलंगेकर हे होते. तर व्यासपीठावर काँग्रेस नेते अभय साळुंके, डॉ. अरंिव्ांद भातांब्रे, अजित माने, काँग्रेसचे ग्राणीण जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, महिला जिल्हाध्यक्ष शिलाताई पाटील, जेष्ठ नेते बंडाप्पा काळगे, एल. बी. आवाळे, माजी नगरसेवक ईम्रान सय्यद, मिडीया सेलचे प्रवीण सुर्यवंशी, जिल्हा बँकेचे संचालक जयेश माने, शिवसेना उबाठाचे भागवत वंगे, प्रताप माने, राष्ट्रवादी आदीजण उपस्थित होते.
   आभार व जनसंपर्क दौरा निमित्त तालुक्यात प्रथमच आलेले खासदार डॉ. शिवाजी काळगे यांचे फटाक्यांची आतिषबाजी व वाजत गाजत जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला.आपल्या भूमीपुत्र खासदार डॉ. काळगे यांचा अनेक गावांतील कार्यकर्ते व नागरिकांनी सत्कार करून अक्षरश: शुभेच्छांचा वर्षाव केला.
   या प्रसंगी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील उजेडकर, कॉंग्रेस सेल जिल्हाध्यक्ष संजय बिराजदार, युवक तालुकाध्यक्ष सुतेज माने, युवा शहराध्यक्ष शैलेश वलांडे, रमेश सोनवणे, सादात पटेल, नगरसेवक सुधीर लखनगावे, रामकिशन गड्डीमे, अशोक कोरे, सोमा तोंडारे, अकबर तांबोळी, प्रा.मोहनराव भोसले, दत्तात्रय भोसले, बाळासाहेब पाटील, ज्ञानेश्वर पाटील, भरत श्ािंदे आदी  कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR