22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरविकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून गोल्ड क्रेस्ट हाय स्कूलची सुरुवात

विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून गोल्ड क्रेस्ट हाय स्कूलची सुरुवात

लातूर : प्रतिनिधी 
राज्य आणि देशातील  प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित होत असलेला लातूरमध्ये अद्यावत पद्धतीचे शिक्षण मिळावे म्हणून विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रेरणेतून गोल्ड क्रेस्ट हाय स्कूलची सुरुवात केलेली आहे, अत्यंत उत्साहाच्या वातावरणात पार पडलेल्या या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कलाविष्कार  पाहिल्यानंतर या स्कूल स्थापणेमागचा उद्देश सफल झाल्याची प्रचिती आली असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.
विलासराव देशमुख फाउंडेशन अंतर्गत असलेल्या लातूरच्या गोल्ड क्रेस्ट हाय संस्थेच्या ११ व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा शुभारंभ  दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होमी भाभा विज्ञान व शिक्षण सेंटरचे वरिष्ठ अधिकारी डॉ. नरेंद्र डी. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला या प्रसंगी ते बोलत होते. या वार्षिक स्रेहसंमेलन प्रारंभी राष्ट्रगीत तद्नंतर माजी मुख्यमंत्री विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन मान्यवरांनी अभिवादन केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात करण्यात आली.
गोल्ड क्रेस्ट  हायच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गणेश वंदना, देशभक्त्तीपर गीत, भारतीय संकृती, विविध नृत्य प्रकार  यासह विविध कला आविष्काराचे सादरीकरण केले मान्यवरासह, विद्यार्थी पालकांनी मनमुराद आनंद लुटला. दरम्यान गोल्ड क्रेस्ट  हाय कडून वेळोवेळी विद्यार्थी, पालक,शिक्षक यांच्या संयुक्त  सहभागातून राबविण्यात आलेले विविध उपक्रम, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमाची माहिती डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून उपस्थिताना देण्यात आली.
यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, ज्यावेळी गोल्ड क्रेस्ट हाय सुरु करण्याचा निर्णय घेतला त्या वेळेपासून आजतागायत पालकांनी चांगले सहकार्य केले. या संस्थेला ११ वर्ष होताहेत वार्षिक स्रेहसंमेलन कार्यक्रमास उपस्थित राहताना खूप आनंद होत आहे. या संस्थेने स्थापनेपासून आजतागायत शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीचे शिखर गाठले आहे. शैक्षणिक गुणवत्ता राखून विविध क्रीडा प्रकार, कौशल्य अभ्यासक्रम कार्यशाळा, एरोबिक्स, अथेलेटिक्स, यात देखील येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ठ कामगिरी केलीय. विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार अभ्यासक्रम असायला हवा विद्यार्थ्यांला शाळेत शिकवलेल्या अभ्यासाचे केवळ रिविजन घरी केले जावे. आपल्या पाल्याचा, विद्यार्थ्यांच्या कल कोठे आहे हे शाळेने आणि पालकांनी समजून घ्यायला हवे तरच आपल्या पाल्याचा,विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि त्याला हव्या त्या क्षेत्रात करिअर करणे सोपे जाईल शिक्षण क्षेत्रातील नवनवे प्रयोग राबवण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचा विकास करण्यासाठी ही संस्था कायम कार्यरत राहील अशी ग्वाहीही याप्रसंगी बोलतांना दिली.
लातुरमध्ये डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे प्रमाण आहे हे पाहता व्हीडीएफ, मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट, गोल्ड क्रेस्ट हाय सोबत होमी भाभा रिसर्च सेंटर ने टायप करून नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवावेत असे आवाहन करून उपस्थित सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना डॉ. नरेंद्र देशमुख म्हणाले की,  अशा कार्यक्रमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात एक जवळीक निर्माण होते आणि हे अत्यंत गरजेचे आहे. प्रत्येक आई आपल्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी सांगते पण माझ्या आईने मी वैद्यज्ञानिक व्हावे यासाठी प्रयत्न केले मला तसे मार्गदर्शन व शिक्षण दिले आणि आज मी होमी भाभा सारख्या संस्थेचा भाग आहे याचे मला समाधान आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांने महिन्यातुन किमान एकतरी शालेय  अभ्यासक्रम व्यतिरिक्त्त शैक्षणिक पुस्तक वाचावे असे आवाहन केले जेणेकरुन याचा फायदा त्या विद्यार्थ्यांला त्याच्या भविष्यात नक्कीच होईल असे म्हणत विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले.
यावेळी विलास सहकारी साखर कारखाना व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, विलास को.ऑप.बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, प्राचार्य मोहन बुके, गोल्ड क्रेस्ट  हाय संचालक डॉ. सविता साबळे, प्रिन्सिपल-श्रीमती उषाकिरण सूद यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR