रेणापूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांनी या भागात विकासाचे स्वप्न बघून त्यांनी ती समर्थपणे विकासाची दिशा दाखवली ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न सोडवल. विकासाचे जाळे विणले असून विकास कामे करत असताना पक्षीय भेद बाजूला सारुन सर्वांगीण विकास केला त्यामुळें रेणापूर तालुक्यांतील कायम काँग्रेस पक्षाला आशिर्वाद मिळालेले असून आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मागे आशिर्वाद द्यावेत, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले आहे.
रेणापूर तालुक्यांतील सायगाव, सारोळा व्हटी नंबर १, गोडाळा कारेपूर, खलंग्री येथील मतदारांशी आमदार धिरज देशमुख यांनी दि. २२ ऑक्टोबर रोजी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. या संवाद बैठकीस गावागावातून मोठा प्रतिसाद मिळत असून ग्रामस्थांनी आमदार धिरज देशमुख यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले आहे. यावेळी संवाद दौ-यात रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील, रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, रेणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब चव्हाण, रेणापुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमाकांत खलग्रे, माजी सभापती चंद्रचूड चव्हाण, माजी सभापती रमेश सूर्यवंशी, रेणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह विविध गावातील सरपंच, चेअरमन, काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.