विक्रोळी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, विक्रोळीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. विक्रोळीत पोलिसांनी व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने एख कॅश व्हॅन पकडली आहे. या व्हॅनमध्ये साडे सहा टन चांदीच्या विटा पकडल्या आहेत.
मिळालेली माहिती अशी, करोडोंच्या घरात यांचीकिंमत आहे. या चांदीच्या विटा मुलुंड मधील एका गोदाममध्ये ब्रिक्स या कंपनीच्या गाडीतून ठेवण्यासाठी चालल्या होत्या. या विटा अधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणुक आयोग, इन्कम टॅक्स, पोलिसांनी अधिक तपास करत आहेत. काही दिवसापूर्वी मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटातील चिंतामण वाडी पोलिस चौकीजवळ स्थानिक पोलिसांच्या हाती मोठे घबाड लागले होते. पोलिसांनी आज नाकाबंदीदरम्यान नाशिकहून मुंबईकडे जाणारी एम. एच. ११. बी. व्ही. ९७०८ या गाडीत २ कोटी रुपयांची रक्कम आढळून आली आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चिंतामण पोलिस चौकीजवळ स्थानिक पोलिस कर्मचा-यांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी एम. एच. ११. बी. व्ही. ९७०८ या गाडीत रोख रक्कम आढळून आली आहे. या गाडीत अंदाजे २ कोटी रुपयांच्या आसपास रक्कम पोलिसांनी जप्त केली.