22 C
Latur
Friday, December 20, 2024
Homeउद्योगविजय मल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना दिले १४,००० कोटी!

विजय मल्ल्याला दणका, संपत्तीचा लिलाव करुन बँकांना दिले १४,००० कोटी!

 

नवी दिल्ली : विशेष प्रतिनिधी
सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनात खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सत्ताधारी पक्षाकडून दिली जात आहेत. याशिवाय विविध विधेयके देखील सादर करण्यात येत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत माहिती देताना म्हणाल्या, विजय मल्ल्याची संपत्ती विकून विविध बँकांना १४ हजार कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. याशिवाय निरव मोदी याची संपत्ती विकून १,०५३ कोटी रुपये देखील बँकांना देण्यात आले. या दोन्हीसह विविध घोटाळ्यात अडकलेल्या रकमेसह एकूण २२,२८० कोटी रुपये संबंधितांना परत करण्यात आले आहेत.

ईडी आणि बँकांनी मुंबईच्या विशेष न्यायालयात धाव घेतली. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीच्या संपत्तीच्या विक्रीच्या परवानगीच्या मागणीसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेच्या १३ हजार कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग केले होते. त्यानंतर तो देश सोडून पळून गेला होता.

विशेष कोर्टाने ईडीला मेहुल चोक्सीच्या जप्त करण्यात आलेल्या २,२५६ कोटींच्या मालमत्तेचे मुल्यांकन आणि आणि लिलाव करण्यास परवानगी दिली होती. विक्रीनंतर मिळणारी रक्कम मुदत ठेवीच्या रुपात पीएनबी इतर ज्यांनी कर्ज दिलेले असेल त्यांच्या खात्यात ठेवण्याचे आदेश दिले होते.

निर्मला सीतारमण या प्रकरणी बोलताना म्हटले की, ‘पीएमएलए’च्या प्रकरणामध्ये ईडीने प्रमुख प्रकरणांमध्ये २२,२८० कोटी रुपयांची संपत्ती परत मिळवली आहे. आम्ही कुणालाच सोडले नाही, जरी ते देश सोडून पळून गेले असले तरी आम्ही त्यांना सोडलेले नाही. ईडीने त्यांच्या संपत्तीचा लिलाव करुन बँकांना पैसे परत दिले आहेत. आर्थिक गुन्हे करणा-यांना कोणत्याही व्यक्तीला सोडणार नसल्याचे म्हटले.

विजय मल्याच्या यूनाएटेड स्पिरिट या कंपनीची विक्री झाली आहे. तर, किंगफिशर एअलाईन देखील बंद झाली आहे. विजय मल्ल्या भारतातून ९ हजार कोटी रुपये घेत देश सोडून गेले होते. विजय मल्ल्याने २००३ मध्ये किंगफिशर एअरलाइन्स सुरु केली होती. किंगफिशरला सर्वात मोठा ब्रँड बनवण्याचा त्याचा प्रयत्न होता. यासाठी एअर डेक्कन कंपनी १२०० कोटी रुपयांना विकत घेण्यात आली होती. या निर्णयामुळे विजय माल्ल्या कर्जात बुडाले. एअर डेक्कन पाठोपाठ किंगफिशर एअरलाइन्स देखील बंद झाली. कर्जाची परतफेड करण्याची क्षमता न उरल्याने विजय माल्ल्याने देश सोडला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR