23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeपरभणीविद्यार्थ्यांनी अडथळे बाजूला सारून यशाचे शिखर गाठावे : वरपुडकर

विद्यार्थ्यांनी अडथळे बाजूला सारून यशाचे शिखर गाठावे : वरपुडकर

मानवत : आयुष्यात येणारे अडथळे बाजूला सारून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे असे प्रतिपादन सौ.प्रेरणाताई वरपुडकर यांनी केले.
वरपुडकर एज्युकेशन फाऊंडेशन संचालित रॉयल क्लिफ वर्ल्ड स्कूल मानवत संस्थेच्या सचिव सौ.प्रेरणाताई वरपुडकर यांनी दि.२३ जून रोजी पाथरी विधानसभा मतदार संघातील १०वी, १२वी, नीट, जेईई, सीईटी परीक्षेत नावीन्यपूर्ण यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ माऊली मंगल कार्यालय मानवत येथे आयोजित करण्यात आला होता. तसेच मानवत मधील मुलींच्या कब्बडी संघाचा देखील या वेळी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाथरी विधानसभेचे आ. सुरेशराव वरपुडकर तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.विठ्ठल कांगणे हे होते.

या गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभात १०वी परीक्षेत ९९.२० टक्के गुण प्राप्त केलेले विद्यार्थी सृष्टी ज्ञानेश्वर माकोडे व लक्ष्मण हरिभाऊ ठाकरगे, १२वी परीक्षेत ८९टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी संस्कृती भागवत पोकळे, नीट परीक्षेतील गुणवंत पार्थ दत्ता रोकडे (६९०) मयूर मधुकर कदम (६६५) भगवान मारोती काळे (६५७) प्रसाद उंबरकर (६५४), कुसुमकर सचिन (६६०) प्रमोद रासवे (६५०), मैनावती नवघरे (६५०) मोहिनी होगे (६४३) स्वराज यादव (६३२) सिद्धेश्वर ताल्डे, सीईटी मध्ये ९९ टक्के गुण घेणारे तुषार वडकिले, वेदांत हालगे व संकेत खुडे या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच १०वी व १२वी परीक्षेत ८० टक्केपेक्षा जास्त गुण प्राप्त करणा-या व नीट, जेईई, सीईटीमध्ये कौतुकास्पद यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला. तसेच स्पर्धा परीक्षेत यश संपादित करून आयटीआय प्राचार्यपदी निवड झालेले विशाल थिटे यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

आ.सुरेशराव वरपुडकर यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या विद्यार्थ्यांना साडेचार तास विधिमंडळाच्या कामकाजविषयी मार्गदर्शन केल्याची आठवण प्रा.विठ्ठल कांगणे यांनी सांगितली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचा अभिमान वाढवण्यासाठी मेहनत घेऊन अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावे व यशाचे शिखर गाठावे असे प्रा.विठ्ठल कांगणे यांनी सांगितले. आ.सुरेशराव वरपुडकर यांनी देखील अध्यक्षीय भाषणात गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास मुख्याध्यापीका अर्चना शुक्ला, बाबुराव नागेश्वर, बाबाजी अवचार, भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR